IND W vs NZ W 1st ODI Head To Head: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात कोण आहे वरचढ, येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी
दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. टी-20 विश्वचषक 2024 मधील खराब कामगिरीनंतर भारतीय महिला संघाला चांगली कामगिरी करायची आहे.
Indian Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज, गुरुवारी, 24 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. टी-20 विश्वचषक 2024 मधील खराब कामगिरीनंतर भारतीय महिला संघाला चांगली कामगिरी करायची आहे. विकेटकीपर फलंदाज रिचा घोषला संघात स्थान देण्यात आलेले नाही कारण ती बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहे. अशा स्थितीत यस्तिका भाटियाकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी असेल. दुसरीकडे, न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ यूएईमध्ये टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून आपली विजयी मालिका सुरू ठेवू इच्छित आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
टीम इंडिया आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 54 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 20 सामने जिंकले आहेत. तर, न्यूझीलंड संघाने 23 सामने जिंकले आहेत. दरम्यान, एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. (हे देखील वाचा: IND W NZ W 1st ODI Key Players: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात आज होणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर)
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
टीम इंडिया : यास्तिका भाटिया, उमा छेत्री (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेआय रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, राधा यादव, ए रेड्डी, रेणुका सिंग, श्रेयंका पाटील.
न्यूझीलंड : एमएल ग्रीन, आयसी गेज (विकेटकीपर), बीएम हॅलिडे, जॉर्जिया प्लिमर, एसडब्ल्यू बेट्स, एसी केर, एसएफएम डिव्हाईन (कर्णधार), ईडन कार्सन, एचएम रो, मॉली पेनफोल्ड, एलएमएम ताहुहू.