IND W vs AUS W ICC Women's World Cup 2022 Live Streaming: भारतात कधी आणि कुठे पाहणार भारत-ऑस्ट्रेलिया महिला विश्वचषक सामना लाइव्ह?

ऑकलंडच्या ईडन पार्क येथे मेग लॅनिंग अँड कंपनी विरुद्ध विजयामुळे भारताच्या अव्वल चार संधी तर वाढतीलच शिवाय त्यांचे मनोबल देखील नक्कीच उंचावेल. पण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला विश्वचषक सामना ऑनलाईन आणि टीव्हीवर लाइव्ह कसा व कुठे पाहणार याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

मेग लॅनिंग व मिताली राज (Photo Credit: Twitter/ICC)

IND W vs AUS W, World Cup 2022 Live: आयसीसी महिला विश्वचषक 2022 मधील भारताचा (India) पाचवा सामना टूर्नामेंट विजयाचे प्रबळ दावेदार ऑस्ट्रेलियाशी (Australia) होणार आहे. सहा-वेळा चॅम्पियनविरुद्ध विजय भारतीय संघाच्या (Indian Team) सेमीफायनल गाठण्याच्या आशा पल्लवित ठेवतील. आता खेळल्या चार सामन्यांपैकी दोन विजय आणि दोन पराभवांसह ते सध्या आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर आहेत, तथापि, उपांत्य फेरी गाठण्यासाठी ते पुरेसे नाही. शनिवारी मेग लॅनिंग (Meg Lanning) अँड कंपनी विरुद्ध विजयामुळे भारताच्या अव्वल चार संधी तर वाढतीलच शिवाय त्यांचे मनोबल देखील नक्कीच उंचावेल. पण त्यापूर्वी भारत महिला (India Women) विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women), विश्वचषक सामना ऑनलाईन आणि टीव्हीवर लाइव्ह कसा आणि कुठे पाहणार याची तपशील माहिती खालीलप्रमाणे आहे. (IND-W vs AUS-W: टीम इंडियाच्या बॅटिंग समस्यांवर माजी दिग्गज कर्णधाराने ‘रामबाण’ उपाय सुचवला, म्हणाल्या - ‘हरमनप्रीत कौरला ‘या’ क्रमांकावर खेळवा’)

ICC महिला विश्वचषक 2022 मधील भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातील सामना 19 मार्च, शनिवार रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 06:30 वाजता, ऑकलंडच्या ईडन पार्क येथे खेळला जाईल. सामन्यात नाणेफेक सामन्याच्या अर्धातास पूर्वी म्हणजे सकाळी 6:00 वाजता होईल. भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला ICC महिला विश्वचषक सामना भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल, तर लाइव्ह स्ट्रीमिंग Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. याआधीच्या 49 वनडे सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी केवळ दहा वेळा ऑस्ट्रेलियाच्या महिलांना हरवलं आहे.

भारत महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ

भारत महिला: मिताली राज (कॅप्टन), स्मृती मंधाना, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, रिचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्रकर, झुलन गोस्वामी, स्नेह राणा, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, पूनम यादव, तानिया भाटिया, रेणुका सिंग.

ऑस्ट्रेलिया महिला: मेग लॅनिंग (कॅप्टन), रॅचेल हेन्स, अलिसा हिली (विकेटकीपर), एलिस पेरी,बेथ मूनी, तहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अलाना किंग, अमांडा वेलिंग्टन, मेगन शुट, डार्सी ब्राउन, जेस जोनासेन, ग्रेस हॅरीस, निकोला केरी, अॅनबेल सदरलँड.