IND vs WI Test 2019: वेस्ट इंडिज टेस्ट मालिकेत रिषभ पंत, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह गाठू शकतात 'हे' महत्त्वपूर्ण टप्पे

भारताचा युवा फलंदाज आणि विकेटकीपर रिषभ पंतने विंडीजविरुद्ध मालिकेत आठ डिसमिसल्स केल्यास टेस्ट क्रिकेटमध्ये 50 डिसमिसल्स करणारा सर्वात वेगवान भारतीय यष्टीरक्षक बनू शकतो. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला टेस्टमध्ये 150 विकेट्स पूर्ण करण्यासाठी सहा गडी बाद करण्याची आवश्यकता आहे.

रिषभ पंत, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह (Photo Credit: Getty)

विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 आणि वनडे मालिकेनंतर टेस्टमध्ये वेस्ट इंडिजशी (West Indies) दोन हात करण्यास सज्ज आहे. 22 ऑगस्टपासून सुरू होणारी ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा म्हणून मोजली जाणार आहे. दोन देशांमध्ये आतापर्यंत 96 कसोटी सामने खेळले गेले. त्यापैकी 30 सामने विंडीजने,तर 20 सामने भारताने जिंकले. उर्वरित 46 सामने अनिर्णित राहिले. आगामी टेस्ट मालिकेत भारतीय संघ टी-20 आणि वनडेमधील फॉर्म कायम ठेवत टेस्टमध्ये विंडीजचा व्हाईट वॉश कार्याच्या निर्धारित असेल. संघासाठी आणि काही खेळाडूंसाठी आगामी मालिका महत्वाची असणार आहे. (IND vs WI 1st Test: अँटिगामध्ये पहिली टेस्ट जिंकत विराट कोहली याला एम एस धोनी याच्या 'या' मोठ्या रेकॉर्डची बरोबरी साधण्याची संधी)

भारत (India) आणि विंडीजमधील पहिला सामना अँटिगामध्ये खेळाला जाईल. यासामन्यात टीम इंडियाचे काही खेळाडू त्यांच्या टेस्ट कारकिर्दीतील सांख्यिकीय टप्पे ओलांडू शकतात. भारताचा युवा फलंदाज आणि विकेटकीपर रिषभ पंत (Rishabh Pant) याने विंडीजविरुद्ध मालिकेत आठ डिसमिसल्स केल्यास टेस्ट क्रिकेटमध्ये 50 डिसमिसल्स करणारा सर्वात वेगवान भारतीय यष्टीरक्षक बनू शकतो. पंतने आजवर 9 टेस्ट सामने खेळले आहेत. यात त्याने 42 डिसमिसल्स, (40 झेल, दोन स्टंपिंग्स) केले आहेत. याआधी माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने 15 सामन्यात 50 डिसमिसल्स केले होते. आणि जर विंडीजविरुद्ध पंतला हा टप्पा ओलांडण्यास यश मिळाले तर तो धोनीला मागे सारत हा रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो. शिवाय या रेकॉर्डसह तो मार्क बाऊचर (Mark Baucher) आणि टिम पेन (Tim Paine) यांची बरोबरी करू शकतो. बाऊचर आणि पेनने 10 टेस्ट सामन्यात 50 गडी बाद करण्याचा विक्रम केलाय.

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला टेस्टमध्ये 150 विकेट्स पूर्ण करण्यासाठी सहा गडी बाद करण्याची आवश्यकता आहे. 28 वर्षीय शमीने 40 सामन्यांत 144 विकेट्स घेतल्या आहेत. तर, टीम इंडियाचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने दहा टेस्ट सामन्यात 49 विकेट्स घेतल्या आहेत. 11 व्या सामन्यात त्यांनी 50 वीं विकेट घेतली तर त्याला नरेंद्र हिरवाणी यांच्यासह भारताकडून 50 विकेट घेणारा दुसरा वेगवान गोलंदाजांचा मान मिळवेल.