IPL Auction 2025 Live

IND vs WI: वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाची निवड लांबणीवर, या कारणांमुळे होतोय विलंब

पण आता ती निवड पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचे कारण म्हणजे आयएएनएसशी बोलताना सूत्रांनी सांगितल्या प्रमाणे, सीओएने आपल्या नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे संघाची निवड करण्यासाठी विलंब होतोय.

(Photo by Henry Browne/Getty Image)

आयसीसी (ICC) विश्वचषकमधील पराभवाला मागे टाकत भारतीय संघ (Indian Team) आता वेस्ट इंडिज (West Indies) दौर्यासाठी सज्ज होत आहे. टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. इंडिजविरुद्ध मालिकांसाठी शुक्रवारी, 19 जुलै रोजी संघाची निवड करण्यात येणार होती. पण आता ती निवड पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचे कारण म्हणजे आयएएनएसशी (IANS) बोलताना सूत्रांनी सांगितल्या प्रमाणे, सीओए आपल्या योजनेट बदलण्यात केल्यामुळे निवड प्रक्रियेत विलंब झाला आहे. सीओए (CoA) च्या नियमानुसार सचिव यापुढे कोणत्याची बैठकीत भाग घेणार नाही आणि संघात कोणताही बदल किंवा बदली करण्यासाठी त्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही. शिवाय सीओईने हा ही निर्णय घेतला आहे की आतापासून कोणत्याही पदाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिकेट समितीच्या बैठकीत उपस्थित राहणार नाहीत. (टीम इंडिया प्रशिक्षक प्रकियेत विराट कोहली याचे वजन घटले, BCCI ने दाखवला बाहेरचा रस्ता)

दरम्यान, सुत्रांप्रमाणे निवड समितीची बैठक शनिवार किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे. पण बीसीसीआयने अजून यावर कोणतीही सूचना दिली नाही. पण संघाची घोषणा सोमवारी करणार असल्याचे म्हटले जात आहे.

दुसरीकडे, वेस्ट इंडिज दौर्यासाठी उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे वनडे आणि टी-20 चे कर्णधारपद दिले जाऊ शकते. कारण विराट कोहली (Virat Kohli) ने या सामन्यांमध्ये न खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण विश्वचषकानंतर आता आपण या सामन्यांमध्ये खेळण्यास तयार आहोत, असे कोहलीने स्पष्ट केले आहे.