IND vs WI मॅचदरम्यान वीरेंद्र सेहवाग ने विचारला टीम इंडिया आणि प्रत्येक चाहत्याला टोचणारा प्रश्न, पहा Post

सेहवाग म्हणाला, फिरकी गोलंदाजांविरुद्ध इतकं बचावात्मक खेळू शकत नाही.

(Image Credit: Twitter)

आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये विराट कोहली (Virat Kohli) च्या भारतीय संघाचे विजयी रथ कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे चालत जात आहे. टीम इंडिया ने आपले 6 पैकी 5 सामने जिंकले असून 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध विजयाने भारताचा सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र, या भारताच्या या विजयाने एक व्यक्ती नाखूष आहे आणि तो म्हणजे भारताचा माजी सलामीवीर वीरेंदर सेहवाग (Virender Sehwag). तसं त्याच कारणही विचार करण्यासारखे आहे. (ICC World Cup 2019: IND vs WI मॅचमध्ये स्वस्तात आऊट झाल्याने विजय शंकर परत एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर)

वेस्ट इंडिज विरुद्ध मॅचदरम्यान सेहवागने ट्विट करत टीम ला आणि चाहत्यांना एक प्रश्न विचारला जो नक्की त्यांना खुपसणारा आहे. सेहवाग म्हणाला, "रशिद खान (Rashid Khan) च्या 4 ओव्हरमध्ये 25 धावा दिल्या आणि पुढच्या 6 षटकात त्याने केवळ 13 धावा दिल्या. फॅबियन ऍलन (Fabian Allen) ने पाच ओव्हरमध्ये 34 धावा केल्या आणि पुढील पाच ओव्हरमध्ये त्याने फक्त 18 धावा दिल्या. फिरकी गोलंदाजांविरुद्ध इतकं बचावात्मक खेळू शकत नाही."

अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्धच्या सामन्यानंतरही भारतीय फलंदाजांची वेगवान आणि मंद गोलंदाजांविरुद्ध संथ खेळीची टीका केली गेली. केदार जाधव (Kedar Jadhav) आणि एम एस धोनी (MS Dhoni) ने अफगाणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध खूप डॉट बॉल खेळले ज्यामुळे टीम मोठा स्कोर करून शकली नाही. वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात ऍलनने पहिल्या पाच षटकात 34 धावा आणि पुढच्या पाच षटकात त्याने फक्त 18 धावा दिल्या.