IND vs WI 1st ODI Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वनडे सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट कसे आणि कुठे पाहणार?
तथापि, त्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल कारण विंडीज संघ चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. दरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला वनडे सामना लाइव्ह कधी, कुठे आणि कसा पाहणार याबाबत सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.
IND vs WI 1st ODI Live Streaming: भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket Team) रविवारी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनेक अर्थाने खूप खास असेल. हा सामना भारतासाठी सर्वात खास आहे कारण हा त्यांचा 1000 वा एकदिवसीय सामना असेल आणि तो जिंकून त्यांना आणखी खास बनवायचे आहे. दुसरी उल्लेखनीय बाब म्हणजे व्हाईट बॉल संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) या सामन्यासह फॉरमॅटमध्ये संघाची कमान आपल्या हाती घेईल. तथापि, त्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल कारण शेवटच्या टी-20 मालिकेत जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक असलेल्या इंग्लंडविरुद्ध 3-2 ने विजय मिळवलेला विंडीज संघ चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. दरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला वनडे सामना लाइव्ह कधी, कुठे आणि कसा पाहणार याबाबत सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. (Team India 1000 ODI: टीम इंडियाला 1000 वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सचिन तेंडुलकरकडून शुभेच्छा)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसर दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तर सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 1:00 वाजता नाणेफेक होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि Disney + Hotstar अॅपवर देखील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
भारत आणि वेस्ट इंडिज वनडे संघ
भारतीय संघ: रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, आणि शाहरुख खान.
वेस्ट इंडिज संघ: शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शमारह ब्रूक्स, डॅरेन ब्रावो, किरोन पोलार्ड (कॅप्टन), जेसन होल्डर, फॅबियन ऍलन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसे, अकील होसेन, हेडन वॉल्श, केमार रोच, एनक्रुमाह बोनर.