IND vs WI 1st ODI: टीम इंडिया बनली ‘एकहजारी मनसबदार’, 1000 वा एकदिवसीय सामना खेळणारा भारत बनला जगातील पहिला संघ

या सामन्यापूर्वी भारताने 999 एकदिवसीय सामने खेळले होते आणि 518 विजयांची नोंद केली होती. त्यांना 431 पराभवांना सामोरे जावे लागले होते, तर नऊ सामने बरोबरीत सुटले होते आणि 41 सामने अनिर्णित राहिले.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) 6 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या वनडे सामन्यासाठी मैदानात उतरताच टीम इंडियाने (Team India) इतिहास घडवला आहे. भारत 1000 वा एकदिवसीय सामना खेळणारा हा जगातील पहिला देश ठरणार आहे. भारतीय संघाला (Indian Team) इथपर्यंत पोहोचायला 48 वर्षे लागली. टीम इंडिया 1000 वा वनडे खेळणारा पहिला आणि एकूण दुसरा संघ बनेल. इंग्लंडने यापूर्वी 1045 कसोटी सामने खेळले आहेत. भारताने पहिला वनडे सामना 1974 मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध खेळला होता. दरम्यान, टीम इंडियाच्या या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक उपस्थित राहणार नाहीत. (IND vs WI 1st ODI: पहिल्या वनडेत रोहित शर्माने जिंकला टॉस, 1000 व्या सामन्यात टीम इंडियाचा पहिले गोलंदाजीचा निर्णय)

गुजरात क्रिकेट असोसिएशन भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीनही सामने कोविड-19 महामारीमुळे प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवली जाणार असल्याचे सांगितले होते. भारताच्या 100व्या एकदिवसीय सामन्यात कपिल देव कर्णधार होते तर सौरव गांगुलीने मेन इन ब्लूच्या 500व्या एकदिवसीय सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया (958) आणि पाकिस्तान (936) या दोन संघांनी आतापर्यंत 900 चा टप्पा ओलांडला आहे. भारतीय संघाने आपला पहिला वनडे 48 वर्षांपूर्वी 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे खेळला होता. मात्र या सामन्यात त्यांना चार गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाने प्रथम 1975 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दहा गडी राखून पहिल्या विजयची चव चाखली होती. हा विश्वचषक सामना होता आणि संघ एस वेंकटराघवनच्या नेतृत्वात खेळत होता.

भारतीय संघाने प्रथम दक्षिण आफ्रिकेला 120 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर 29.5 षटकांत लक्ष्य गाठले आणि दहा विकेट्स राखून विजय मिळवला. भारताने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये संस्मरणीय क्षण पहिले आहेत. यामध्ये इंग्लंडमध्ये 2002 नॅटवेस्ट मालिका, शारजाह येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिरंगी मालिका, 1983 नंतर 2011 मध्ये मायदेशात विश्वचषक विजय तर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी विजय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या 48 वर्षाच्या इतिहासात भारतीय क्रिकेटपटूंनी आठवणीत  स्वरूपी क्षणी दिले आहेत.