IND vs SL 3rd T20I Live Streaming: भारत-श्रीलंका सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Sports नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा
भारत विरुद्ध श्रीलंका लाईव्ह स्ट्रीमिंग (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd T20I Live Streaming: कोलंबो (Colombo) येथे भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) संघात तीन सामन्यांच्या मालिकेचा टी-20 सामना आज आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे तर दासुन शनाका याच्याकडे यजमान श्रीलंका संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी असेल. श्रीलंका दौऱ्यावरील (Sri Lanka Tour) तीन सामन्यांची टी-20 मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे आजच्या अंतिम व निर्णायक सामन्यात दोन्ही संघ मालिकेत विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा व अंतिम टी-20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 7 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर (Sony Sports Network) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण SonyLiv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो. (IND vs SL 3rd T20I: तिसऱ्या टी-20 पूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ, ‘या’ दुखापतग्रस्त खेळाडूच्या अंतिम सामन्यात खेळण्यावर सस्पेन्स)

यापूर्वी दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका देखील रंगली ज्यात पाहुण्या संघाने 2-1 असा दणदणीत विजय मिळवला होता. दुसरीकडे, दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा फटका बसला. कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि त्याच्या संपर्कात आलेले 8 खेळाडूंना देखील क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे आता संघाला उर्वरित नवोदित खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, नितीश राणा आणि चेतन सकारिया यांनी पदार्पण केले पण एकही पदार्पणवीर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आता या युवा खेळाडूंकडून निर्णायक सामन्यात प्रभावी कामगिरीची अपेक्षा असेल. दुसरीकडे, वनडे मालिका गमावल्यावर यजमान लंकन संघाचा टी-20 मालिका जिंकण्याचा निर्धार असेल.

पाहा भारत-श्रीलंका संपूर्ण संघ

टीम इंडिया: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर) , युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौथम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.

श्रीलंका: दासुन शनाका (कॅप्टन), धनंजया डी सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथम निसानका, चरित असलांका, वनिंदू हसरंगा, आशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुष्रा लखनथमे संदकन, अकिला डानंजया, शिरण फर्नांडो, धनंजय लखन, ईशान जयरात्ने, प्रवीण जयविक्रम, असिता फर्नांडो, कसुन रजीठा, लाहिरू कुमारा, इसुरु उदाना.