IND vs SL 2nd T20I 2021: श्रीलंकेने टॉस जिंकला, आधी गोलंदाजीचा निर्णय; भारताकडून ‘या’ पुणेकरासह 4 खेळाडूंचे टी-20 पदार्पण
प्रेमदासा स्टेडियमवर दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. यजमान संघासाठी करो किंवा मरोच्या सामन्यात श्रीलंकन कर्णधार दासुन शनाकाने टॉस जिंकला व पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात काही महत्वपूर्ण बदल झाले आहेत. आजच्या सामन्यात भारतीय संघात देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, नितीश राणा आणि चेतन सकारिया यांना टी-20 पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
IND vs SL 2nd T20I 2021: कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. यजमान संघासाठी करो किंवा मरोच्या सामन्यात श्रीलंकन (Sri Lanka) कर्णधार दासुन शनाकाने टॉस जिंकला व पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात काही महत्वपूर्ण बदल झाले आहेत. आजच्या सामन्यात भारतीय संघात (Indian Team) देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal), रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), नितीश राणा (Nitish Rana) आणि चेतन सकारिया यांना टी-20 पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यावर आणि त्याच्या संपर्कात आलेले तब्बल 8 खेळाडू उर्वरित दोन्ही सामन्यातून बाहेर पडले आहेत. यापूर्वी पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) गोलंदाजांच्या आक्रमक कामगिरीच्या जोरावर 38 धावांनी विजय मिळवला आहे. (IND vs SL 2nd T20I Live Streaming: भारत-श्रीलंका दुसरा टी-20 सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Sports व DD Sports वर आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा)
श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यातून पृथ्वी शॉ, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, मनीष पांडे, ईशान किशन व कृष्णप्पा गौथम उर्वरित दोन्ही सामन्यातून बाहेर पडले आहेत. हे आठही खेळाडू कृणाल पांड्याच्या जवळच्या संपर्कात आले होते त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांना आगामी दोन्ही सामन्यातून बाहेर केले आहे. दरम्यान, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल मंगळवार, 27 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यावर सामना स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे हा सामना आता आज, 28 जुलै रोजी खेळला जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह कृणाल टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. दरम्यान, श्रीलंकेने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत
पाहा भारत-श्रीलंका प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया: शिखर धवन (कॅप्टन), देवदत्त पडिक्क्ल, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश राणा, रुतुराज गायकवाड, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चाहर, नवदीप सैनी, चेतन साकारीया, वरुण चक्रवर्ती
श्रीलंका: दासुन शनाका (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (विकेटकिपत), धनंजय डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, रमेश मेंडिस, वनिंदू हसरंगा, चमिका करुणरत्ने, इसुरु उदाना, अकिला धनंजया, दुश्मंत चमीरा.