IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यापूर्वी Rahul Dravid यांनी स्पष्ट केली आपली रणनीती, हा असणार Shikhar Dhawan च्या टीम इंडियाचा मुख्य हेतू
आगामी श्रीलंका दौर्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.
IND vs SL 2021: शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात भारतीय संघाच्या (Indian Team) आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी (Sri Lanka Tour) संघाचे माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली असून यजमान श्रीलंकेविरुद्ध टीम तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. 13 जुलैपासून सुरू होणार्या या मालिकेसाठी रवाना होण्यापूर्वी एक व्हर्च्युअल पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये धवन आणि राहुल द्रविड यांनी भाग घेतला. द्रविड म्हणाले की, सर्व युवा खेळाडूंना या दौर्यावर खेळण्याची संधी मिळणे शक्य नाही. आगामी श्रीलंका दौर्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. त्यापैकी सहा खेळाडूंनी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. (IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या या खेळाडूंवर असणार नजर, जबर कामगिरी केल्यास मिळू शकते टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट)
राहुल द्रविड म्हणाले की, “मला वाटते की या छोट्या दौर्यावर प्रत्येकाला संधी मिळावी ही आमची अपेक्षा करणे कदाचित अवास्तविक ठरेल जिथे तीन टी-20 सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यात संधी मिळेल आणि भारतीय निवडकही तिथे असतील. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टी-20 संघात स्थान मिळविण्यासाठी खेळाडूंमध्ये ईशान किशन (Ishan Kishan), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि संजू सॅमसन या तिघांचा समावेश आहे.” श्रीलंकेविरुद्ध 13 जुलै रोजी वनडे सामन्याने मालिकेची सुरुवात होईल आणि त्यानंतर 21 जुलैपासून टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. पहिल्या संघाप्रमाणेच शिखर धवनच्या नेतृत्वात द्विपक्षीय मालिका जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याचे देखील द्रविडने सांगितले.
“निश्चितच, बरेच खेळाडू आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी आपली जागा निश्चित करू पाहत आहेत. तेथे काही खेळाडू असतील जे स्थानांसाठी जोर देत आहेत. परंतु आतापर्यंत आम्ही ज्या दोन सत्रांत होतो त्यातील मुख्य विषय मालिका जिंकण्यावर आहे. ते आमचे प्राथमिक उद्दीष्ट असणार आहे. पण आशा आहे की, मालिका जिंकताना खेळाडूंना काही चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल आणि निवड समितीचे दरवाजे ठोठावतील.” द्रविड पुढे म्हणाला की आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ आधीच निश्चित झाला आहे पण तेथे 2-3 खेळाडूंना जागा मिळू शकते.