IND vs SL 2021: भारताच्या इंट्रा-स्कॉड सामन्यात पृथ्वी शॉ, हार्दिक पांड्या समवेत फलंदाजांनी केली चौकार-षटकारांची बरसात, पाहा हायलाइट्स
हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांच्यासारख्या तडाखेबाज फलंदाजांनी दुसर्या इंट्रा-स्क्वॉड सामन्यात चांगलीच फटकेबाजी केली. श्रीलंका क्रिकेटने त्यांच्या यूट्यूब वाहिनीवरएक व्हिडिओ अपलोड केला आणि ज्यात भारतीय खेळाडूंनी चौकार व षटकारांची बरसात केली.
IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) गेलेला भारतीय संघ (Indian Team) सध्या मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी इंट्रा-स्कॉड सामन्यात कसून तयारी करत आहे. शिखर धवन-भुवनेश्वर कुमारच्या इंट्रा-स्कॉड संघातील सामन्याने टीम इंडिया (Team India) खेळाडू लय मिळवण्यासाठी सराव करत आहेत. कोणताही सराव सामना नियोजित नसल्यामुळे आणि खेळाडूंनी अखेरच्या मे महिन्यात आयपीएल दरम्यान खेळला होता, भारतीय संघ आपापसांत खेळत आहे, आणि या सामन्यांचे हायलाइट्स पाहिले तर सर्व खेळाडू चांगल्या फॉर्मयामध्ये दिसत आहेत. हार्दिक पांड्या (Hardik Pandya), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यासारख्या तडाखेबाज फलंदाजांनी दुसर्या इंट्रा-स्क्वॉड सामन्यात गोलंदाजांचा समाचार घेत चांगलीच फटकेबाजी केली. श्रीलंका क्रिकेटने (Sri Lanka Cricket) त्यांच्या यूट्यूब वाहिनीवरएक व्हिडिओ अपलोड केला आणि ज्यात भारतीय खेळाडूंनी चौकार व षटकारांची बरसात केली. (IND vs SL 2021: श्रीलंकेत दिसणार Yuzvendra Chahal याचा नवीन अवतार, फिरकीपटूने स्वतः केली घोषणा)
श्रीलंका क्रिकेटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पृथ्वी, हार्दिक, रुतुराज समवेत अन्य स्टार फलंदाज मोठे फटके खेळताना दिसत आहे. दरम्यान, SLC ने आणखी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये गोलंदाजांची कामगिरी पाहायला मिळत आहे. कुलदीप यादवने तीन, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तसेच चेतन सकारिया आणि दीपक चाहरने प्रत्येकी एक गडी बाद केला. सैनीने देवदत्त पडिक्क्ल आणि हार्दिक पांड्या यांना माघारी धाडलं. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक होण्यापूर्वी मर्यादित षटकांच्या सामन्यांचा हा भारताचा शेवटची मालिका असेल.
श्रीलंकेविरुद्ध सहा सामन्यांच्या भारत दौर्याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल आणि ज्यातील पहिला सामना मंगळवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. सर्वांची नजर पडिक्क्ल, सकारिया, नितीश राणा, कृष्णाप्पा गौथम आणि गायकवाड या पाच अनकॅप्टन खेळाडूंवर असेल तर यापैकी कोणाला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राहुल द्रविडने पहिल्यांदाच वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शॉ आणि संजू सॅमसन यांच्यावरही सर्वांचे लक्ष असेल जे आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी संघात आपले स्थान निश्चित करू पाहत आहेत.