IPL Auction 2025 Live

IND vs SA ODI 2020: भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतील उर्वरित दोन सामने रिक्त स्टेडियममध्ये होण्याची शक्यता, BCCI सूत्रांची माहिती

आणि हे सामने रिक्त स्टेडियममध्ये खेळावे जाऊ शकते आणि याचे कारण म्हणजे कोरोनाव्हायरस. भारत सरकारने बीसीसीआयला कोरोना विषाणूमुळे दोन्ही सामने रिक्त स्टेडियममध्ये खेळवण्याचा सल्ला दिला आहे.

Team India (Photo Credits: Twitter/BCCI)

धर्मशालामध्ये खेळवण्यात आलेल्या भारत (India)-दक्षिण आफ्रिका (South Africa) मधील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. आता दोन्ही टीममधील उर्वरित सामने 15 आणि 18 मार्च रोजी अनुक्रमे लखनऊ (Lucknow) आणि कोलकातामध्ये (Kolkata) खेळले जातील. आणि हे सामने रिक्त स्टेडियममध्ये खेळावे जाऊ  शकते आणि याचे कारण म्हणजे कोरोनाव्हायरस (Coronavirus). भारत सरकारने बीसीसीआयला (BCCI) कोरोना विषाणूमुळे दोन्ही सामने रिक्त स्टेडियममध्ये खेळवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही सामने होणार असले तरी प्रेक्षक स्टेडियममध्ये जाऊन याचा आनंद लुटू शकत नाही. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा कोणता सामना स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय आयोजित केला जाणार आहे.  क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या सल्ल्यानुसार जर एखाद्या खेळाचा कार्यक्रम पुढे ढकलणे अपरिहार्य असेल तर मोठ्या सार्वजनिक मेळाव्याशिवाय हे आयोजन करणे श्रेयस्कर आहे. यानुसार भारत सरकारने आता बीसीसीआयला भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे पुढील दोन सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्यात यावे असे सुचवले आहे. (IND vs SA 1st ODI: धर्मशालेत पाऊस बनला खलनायक, भारत-दक्षिण आफ्रिकामधील पहिली वनडे रद्द)

“बीसीसीआय क्रीडा मंत्रालयाचा सल्लागार मिळाला आहे. अर्थात, आम्हाला मोठ्या प्रमाणात मेळावे टाळण्याचा सल्ला दिला गेला तर आपण त्या पाळल्याच पाहिजेत, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले. तत्पूर्वी, केंद्रीय क्रीडा सचिव राधेश्याम जुलानिया यांनी जर क्रीडा स्पर्धा अटळ असेल आणि आयोजन करावे लागले असेल तर तेथे सार्वजनिक मेळावा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे स्पष्ट केले होते.

कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन आयोजन करणे गरजेचे आहे. भारत कोरोनाचे 70 हुन अधिक रुग्ण समोर आले आहेत.