Abhishek Sharma and Sufyan Muqeem Fight: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान अभिषेक शर्मा आणि सुफयान मुकीम यांच्यात राडा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी (Watch Video)
भारत-पाकिस्तान सामन्यातील या हायव्होल्टेज ड्राम्याची चाहत्यांना कायमच आतुरता असते. याचदरम्यान सध्या सुरू असलेल्या इमर्जिंग आशिया कप 2024 मध्ये या दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानी गोलंदाज मैदानावर भिडताना पाहायला मिळाले.
Abhishek Sharma and Sufyan Muqeem Fight: भारत-पाकिस्तानमध्ये काल इमर्जिंग आशिया कप 2024 चा सामना खेळवला गेला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन केले. दरम्यान भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंह हे सलामीसाठी उतरले. दरम्यान अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानी गोलंदाज मैदानावर भिडताना पाहायला मिळाले.सामन्यात अभिषेक शर्माने 22 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह 35 धावांची खेळी केली. (South Africa Women vs New Zealand Women, Final Key Players To Watch: दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदासाठी लढत; सर्वांच्या नजरा असणार 'या' खेळाडूंवर)
अभिषेक शर्मा-सुफयान मुकीम यांच्यात राडा
प्रभसिमरन सिंहच्या साथीने त्याने पॉवरप्लेमध्ये 68 धावा केल्या. अभिषेक शर्माची विस्फोटक फलंदाजी पाहून पाकिस्तानी गोलंदाज चांगलेच बिथरले होते. पॉवरप्लेनंतर पाकिस्तानकडून सुफियान मुकीम फलंदाजीला आला. सुफियान मुकीमने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला बाद केले. तो बाद होताच पाकिस्तानी गोलंदाजाने अभिषेक शर्माला त्याच्या अॅक्शनमधून मैदान सोडण्याचे संकेत दिले. जे अभिषेक शर्माला आवडले नाही.
याशिवाय पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांही काहीतरी बोलताना दिसले. अभिषेक शर्मा शांतपणे पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता, मात्र तो अचानक थांबला आणि त्याने पाकिस्तानी खेळाडूंना प्रत्युत्तर दिले. पंच मध्ये आल्यानंतर अभिषेक शर्माने जाताना असा काही रागात एक कटाक्ष टाकला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)