IND vs NZ WTC Final 2021 Day 6: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या सहाव्या, राखीव दिवसाच्या पहिल्या सत्रात रिषभ पंतच्या (Rishabh Pant) फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) वर्चस्व गाजवलं आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने तीन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या पण 5 बाद 130 धावांपर्यंत मजल मारली आणि न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) 98 धावांची आघाडी घेतली आहे. निर्णायक दिवसाच्या लंचची घोषणा झाली तेव्हा भारताकडून रिषभ पंत 28 धावा आणि रवींद्र जडेजा 12 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, किवी संघासाठी पहिल्या सत्रात काईल जेमीसनने (Kyle Jamieson) 2 तर ट्रेंट बोल्टने 1 विकेट काढली.
Lunch in Southampton 🍲
A potential thriller awaits...#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/HNwett21vH pic.twitter.com/uRWXUre5ch
— ICC (@ICC) June 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)