IND vs NZ 3rd T20I: टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये रचला इतिहास, सामन्यात रोहित शर्मा सह अन्य खेळाडूंनी केलेले 'हे' रेकॉर्डस् जाणून घ्या

धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात यजमान कीवी संघाने 20 ओव्हरमध्ये फलंदाजी करताना 6 गडी गमावून 179 धावा केल्या. अशा प्रकारे सामना सुपर ओव्हरवर पोहोचला.या तिसर्‍या टी-20 दरम्यान दोन्ही संघांनी शानदार विक्रमांची नोंद केली.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

भारत आणि न्यूझीलंडमधील 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेचा तिसरा सामना हॅमिल्टनच्या सीडन पार्क येथे खेळला गेला, जो टाय राहिला आणि त्याचा परिणाम सुपर ओव्हरमध्ये आला. भारतीय संघाने सुपरओव्हर जिंकला. यासह न्यूझीलंडच्या भूमीवरही भारताने पहिली टी -20 मालिका जिंकली आहे. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिल आणि केन विल्यमसन यांनी 17 धावा केल्या, तर भारतीय संघाचे फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 20 धावा करुन सामना जिंकला. रोहितने अखेरच्या दोन चेंडूंमध्ये 2 षटकार मारत टीम इंडियाला थरारक विजय मिळवून दिला. यापूर्वी त्याने 23 चेंडूत तुफानी अर्धशतक केले होते. भारताचा हा पहिला सुपर ओव्हर सामना होता. तिसर्‍या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 9. धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात यजमान कीवी संघाने 20 ओव्हरमध्ये फलंदाजी करताना 6 गडी गमावून 179 धावा केल्या. अशा प्रकारे सामना सुपर ओव्हरवर पोहोचला. (IND vs NZ 3rd T20I: थरारक सुपर ओव्हर सामन्यात न्यूझीलंड पुन्हा पराभूत, टीम इंडियाने किवी देशात पहिल्यांदा जिंकली टी-20 मालिका)

या तिसर्‍या टी-20 दरम्यान दोन्ही संघांनी शानदार विक्रमांची नोंद केली.

1. न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच मातीत हा भारताचा चौथा टी-20  विजय होता. यापूर्वी न्यूझीलंडच्या भूमीवर दोन्ही संघांमध्ये एकूण 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 4 सामने न्यूझीलंडच्या संघाने जिंकले होते.

2. रोहितने आज 24 व्या वेळी 50 हून अधिक धावा केल्या आहेत. यासह त्याने विराट कोहलीच्या 24 पन्नास पक्षास अधिक धावांची बरोबरी केली आहे.

3. आज, मार्टिन गुप्टिल न्यूझीलंडचा पहिला आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावा करणारा जगातील तिसरा खेळाडू बनला आहे. आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीने त्यांच्या आधी 2500 धावा केल्या आहेत.

4. सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठणारा रोहित देशाचा चौथा क्रिकेटपटू ठरला. हा टप्पा गाठणारा रोहित दुसरा वेगवान सलामी फलंदाज ठरला. रोहितने 219 डाव, तर सचिन तेंडुलकरने 214 डावात ही कामगिरी केली आहे.

5. भारतीय संघाने आज त्यांच्या टी -20 क्रिकेट इतिहासातील पहिला सुपर ओव्हर खेळला. मात्र, याआधी भारतीय संघाने बॉल आऊट खेळली आहे.

या विजयासह भारताने 3-0 ने मालिका खिशात घातली. भारतीय संघाने रोहित शर्मा याच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 179 धावा केल्या. दुसरीकडे, किवी संघाकडून हमीश बेनेटला 3 विकेट मिळाले मिचेल सॅटनर आणि कॉलिन डी ग्रैंडहोम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.