IND vs NZ 3rd T20I: थरारक सुपर ओव्हर सामन्यात न्यूझीलंड पुन्हा पराभूत, टीम इंडियाने किवी देशात पहिल्यांदा जिंकली टी-20 मालिका
या विजयासह भारताने 5 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली आणि किवी देशात पहिल्यांदा टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्क (Seddon Park_ मैदानात खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात यजमान न्यूझीलंडला (New Zealand) टीम इंडियाविरुद्ध (India) पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारताने जिंकण्यासाठी किवी संघाला 180 धावांचे लक्ष्य दिले होते. यजमान संघाकडून कर्णधार केने विल्यमसन (Kane Williamson) याने सर्वाधिक धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. विल्यमसनने 95 धावा केल्या. भारताकडून शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांनी सर्वाधिक 2, रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. टीम इंडियाने केलेल्या 179 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही तितक्याच धावा केल्या, समान टाय झाला आणि सुपर ओव्हर खेळण्यात आली. यामध्ये किवी संघाने पहिले फलंदाजी केली आणि 17 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये विल्यमसनने 11 आणि मार्टिन गप्टिलने 5 धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलने (KL Rahul) सुपर ओव्हर खेळली. या विजयासह भारताने 5 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली आणि किवी देशात पहिल्यांदा टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. रोहितने 15 आणि राहुलने 5 धावा केल्या. रोहितने अखेरच्या दोन चेंडूंमध्ये 2 षटकार मारत टीम इंडियाला थरारक विजय मिळवून दिला. 12 महिन्यांमध्ये न्यूझीलंड तिसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळला. यापूर्वी, इंग्लंडविरुद्ध विश्वचषक फायनल आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्याच प्रतिस्पर्धीविरुद्ध पाचव्या टी-20 सामन्यात सुपर ओव्हर खेळली गेली होती. या दोन्हीमध्ये किवी संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आणि यंदाही परिणाम सारखाच राहिला आणि न्यूझीलंडला तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. (IND vs NZ 3rd T20I: विराट कोहली ने मोडला एमएस धोनी चा वर्ल्ड रेकॉर्ड, बनला टी-20 मध्ये भारताचा यशस्वी कर्णधार)
भारतीय संघाविरुद्ध 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेच्या या तिसर्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.अशा परिस्थितीत भारतीय संघाने रोहित शर्मा याच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 179 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो यांनी न्यूझीलंडला चांगली सुरुवात दिली. या दोघांनी 5.4 षटकांत 47 धावांची भागीदारी केली. शार्दुल ठाकूरने ही जोडी मोडली आणि गप्टिलला सब्स्टिटूट फील्डर संजू सॅमसनकडे झेलबाद केले. गप्टिलने 12 चेंडूत 22 धावा केल्या. रवींद्र जडेजाने केएल राहुलकडून पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावांवर मुनरोला स्टंप आऊट केले. किवी संघाला तिसरा धक्का मिशेल सॅटनरच्या रुपाने आला, त्याने 9 धावा केल्या आणि युजवेंद्र चहलने त्याला बोल्ड केले. यानंतर कर्णधार विल्यमसनने महत्वपूर्ण अर्धशतक केले.
भारताकडून रोहितने 65 धावा, विराट कोहली ने 38 आणि राहुलने 27 धावा केल्या. तर, किवी संघाकडून हमीश बेनेटला 3 विकेट मिळाले मिचेल सॅटनर आणि कॉलिन डी ग्रैंडहोम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.