IND vs NZ 2nd ODI: भारताची आक्रामक गोलंदाजी; मार्टिन गप्टिल, रॉस टेलर यांच्या अर्धशतकाने टीम इंडियासमोर 274 धावांचे लक्ष्य
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने पहिले फलंदाजी करत 8 विकेट्स गमावून 273 धावा केल्या आणि टीम इंडियासमोर 274 धावांचे लक्ष्य दिले. रॉस टेलर 73 धावा करून नाबाद परतला.
ऑकलँडच्या इडन पार्क मैदानावर न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या (India) गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी तो निर्णय योग्य सिद्ध केला. निर्धारित 50 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने पहिले फलंदाजी करत 8 विकेट्स गमावून 273 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सलामी फलंदाज मार्टिन गप्टिल (Martin Guptill) याने सर्वाधिक 79 धावा केल्या. हेन्री निकोल्स 41, टॉम ब्लंडेल 22 धावांचे योगदान दिले. मागील सामन्यातील शतकवीर रॉस टेलर (Ross Taylor) 73 धावा करून नाबाद परतला. भारताने आज गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात प्रभावी खेळी केली, विशेषतः रवींद्र जडेजा याने. भारताकडून युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने सर्वाधिक 3, शार्दूल ठाकूर याने 2 आणि रवींद्र जडेजा याने 1 गडी बाद केला. जडेजाने जिमी निशामचा केलेला रनआऊट महत्वपूर्ण ठरला. (IND vs NZ 2nd ODI: हेन्री निकोल्स ला Time-Out झाल्यावरही रिव्यू दिल्याने संतप्त विराट कोहली याने मैदानावर घातला अंपायरशी वाद)
प्रथम फलंदाजी करताना निकोल्स आणि गप्टिलने न्यूझीलंडला जोरदार सुरुवात करून दिली. चहलने निकोल्सला 59 चेंडूत 41 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. पहिली विकेट पडल्यानंतरही गप्टिलने एका टोकावरून सांभाळून फलंदाजी करत होता. त्याने 49 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान, शार्दूलने 22 धावांवरब्लंडेलला कॅच आऊट केले. शतकाच्या जवळ असलेला गप्टिलही मोठं डाव खेळू शकला नाही आणि 79 चेंडूत 79 धावा करून रनआऊट झाला. कर्णधार टॉम लाथम (Tom Latham) ही खास करू शकला नाही. जडेजाने त्याला 7 धावांवर एलबीडब्ल्यू बाद केले. आजच्या सामन्यात जडेजाने चपळ श्रेत्ररक्षण केले. त्याने निशामला 3 धावांवर रनआऊट करा आठवा किवी फलंदाज तंबूत पाठवला. भारतविरुद्ध डेब्यू करणारा काइल जैमिसन (Kyle Jamieson) धावा करून टेलरसह 25 नाबाद परतला. जैमिसन आणि टेलरने 38 चेंडूत अर्धशतकी भागीदारी करत टीमला आव्हानात्म धावा करण्यात महत्वाची भूमिका बजावली. बुमराहने शेवटच्या षटकात 14 धावा दिल्या.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहे. मोहम्मद शमीच्या जागी सैनी आणि कुलदीप यादवच्या जागी चहलचा समावेश करण्यात आला आहे. किवी संघात दोन खेळाडूंनी आजच्या सामन्यातून पदार्पण केले. मार्क चैपमैन आणि जैमिसनने वनडे क्रिकेटमध्ये आज डेब्यू केले. आजच्या सामन्यात विजय मिळवत भारत ऑकलँड,मध्ये दौऱ्यावरील हॅटट्रिक करू इच्छित असेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)