IND vs ENG 3rd T20I 2025 Toss Update: भारताने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG 3rd T20I 2025) आज राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर (Niranjan Shah Stadium, Rajkot ) खेळवला जात आहे. सामन्याला 7.00 वाजता सुरुवात होईल. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. तर दुसऱ्या सामन्यात देखील तिलक वर्माच्या शानदार खेळीने भारताने 2 विकेटने हा सामना जिंकला होता. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची असेल, तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या ( Jos Buttler) खांद्यावर आहे. तर, (हेही वाचा - Who Is U19 Cricketer Gongadi Trisha: कोण आहे गोंगडी त्रिशा, जिने झळकावले 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकात ऐतिहासिक शतक)
या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये एक मोठा बदल केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला मोहम्मद शमी याने पुन्हा एकदा संघात पुनरागमन केले आहे. या सामन्यात अर्शदीपला विश्रांती ही देण्यात आली आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: फिलिप साल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड
(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2025 06:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

