IND vs AUS World Cup 2023 Final: नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरक्षा वाढवली, ६००० पेक्षा कर्मचारी सज्ज, RAF तैनात

६००० हून सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहे असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानीं माध्यमांना माहिती दिली आहे.

World Cup (Photo Credit - Twitter)

IND vs AUS World Cup 2023 Final: आज १९ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्टेलिया यांच्यातील विश्वचषक अंतिम सामना होणार आहे. हा सामना अहमदाबाद शहरात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. अहमबाद पोलिसांनी शनिवारी विश्वचषका संदर्भात पत्रकार परिषद बोलावली त्यात काही महत्त्वाच्या सुचना पोलिसांकडून देण्यात आल्या.अहमदाबाद येथे पोलिसांनी सुरक्षा वाढवल्याची सांगितली आहे. ६००० हून सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहे असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानीं माध्यमांना माहिती दिली आहे.

आजचा महायुध्द सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स हे प्रमुख व्यक्तिमत्त्व हजेरी लावणार आहे, असे अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुजरात पोलिस रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ), होमगार्ड आणि इतरांचे जवान, एक लाखाहून अधिक प्रेक्षकांच्या हालचाली आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती लक्षात घेऊन विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

स्टेडियममध्ये एक ते दीड लाखांपर्यत प्रेक्षकांची हजरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टेडियम मध्ये कोणाहे अडथळे निर्माण होणार नाही यासाठी ६००० हून सुरक्षा आणि पोलिस कर्मचारी सज्ज केले जात आहे. त्यापैकी ३००० हे स्टेडियमच्या आत राहतील आणि इतर महत्त्वाच्या स्थानांवर राहतील.