IND vs AUS Test 2020: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आजमावणार हात, टेस्ट मालिकेत 'विराट'सेनेपुढे असणार 'हे' चॅलेंज
मर्यादित ओव्हरनंतर आता दोन्ही क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये हात आजमावण्यासाठी सज्ज होत आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया संघात जबरदस्त ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ खेळाडू आहेत, त्यामुळे मालिका रंगतदार होणार हे नक्की, मात्र विराटसेनेपुढे मालिकेत मोठ्या चॅलेंज असतील. 2018-19 दौऱ्यापेक्षा कसोटी मालिकेत यंदा भारतीय संघाला बर्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
IND vs AUS Test 2020: एकदिवसीय आणि टी-20 मालिकेनंतर भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघ कसोटी मालिकेत आमने-सामने येतील. मर्यादित ओव्हरनंतर आता दोन्ही क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये हात आजमावण्यासाठी सज्ज होत आहेत. 17 डिसेंबर रोजीज दोन्ही संघात संघातील पहिल्या सामन्यासह मालिकेची सुरुवात होईल. भारत-ऑस्ट्रेलिया संघात जबरदस्त ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ खेळाडू आहेत, त्यामुळे मालिका रंगतदार होणार हे नक्की, मात्र विराटसेनेपुढे (Virat Kohli) मालिकेत मोठ्या चॅलेंज असतील. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका जिंकली तर भारताने टी-20 मालिका जिंकली, पण आता सर्वांचे लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World test Championship) भाग असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेवर आहे. 2018-19 पेक्षा कसोटी मालिकेत यंदा भारतीय संघाला बर्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. (Most T20I Runs for India in 2020: केएल राहुल यंदा सर्वाधिक धावा करत बनला भारताचा टी-20 'किंग', विराट कोहली 'या' स्थानी)
मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने 2-1 ने ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती, मात्र त्यावेळी डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ संघाचा भाग नव्हते. आता दोघेही परतले आहेत. स्मिथ आणि वॉर्नरने वनडे मालिकेत दमदार कामगिरी केली होती. मात्र, दोघेही टी-20 मालिकेत फारसा प्रभाव पडू शकले नाही, त्यामुळे दोघे आता कसोटी मालिकेत कसर भरून काढू इच्छित असतील. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करणे खासकरुन कांगारूंच्या जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांची फार कठीण असेल. फलंदाजांना मर्यादित ओव्हरपेक्षा कसोटीत अधिक शिस्तबद्ध कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. शिवाय, नियमित कर्णधार विराट कोहली देखील पहिला सामना खेळून मायदेशी परतणार आहे.
रोहित शर्माही पहिल्या दोन सामन्यांना मुकणार असल्याने संघाला प्रभावी सुरुवातीला अनुभवी जोडीची गरज आहे. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल पहिल्या सराव सामन्यात अपयशी ठरले होते. अशा स्थितीत मयंक अग्रवालसोबत सलामीला कोण येईल याचे आव्हान संघासमोर असेल. दुसरीकडे, रवींद्र जडेजा अद्याप फिट नसल्याने त्याचे पाहिल्यास पाण्यात खेळणे निश्चित नाही आहे, शिवाय हार्दिक पांड्या ही संघात नसल्याने अष्टपैलूची जबाबदारी कोणाला मिळेल हे देखील निश्चित करणे संघासाठी डोकेदुखी ठरेल.
(The above story first appeared on LatestLY on Dec 09, 2020 11:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

