IND vs AUS: क्वारंटाईनमध्ये असतानाही क्रिकेटपटू आर अश्वीन याची धमाल, पत्नी Prithi Narayanan हिच्यासोबत साजरा केला लग्नाचा वाढदिवस; पाहा Photos

या जोडप्याच्या लग्नाचा 9वा वाढदिवस होता आणि अश्विनची पत्नी प्रीतीने दोघांच्या फोटोंसह एक आनंददायक पोस्ट शेअर केली आणि लिहिले एकत्र क्वारंटाइन असण्यापेक्षा रोमँटिक आणखी काय असू शकते ज्यातून सुटण्याचा कोणताही मार्ग नाही?

आर अश्विन आणि पत्नी प्रीती नारायणन (Photo Credit: Instagram)

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) आगामी दौर्‍यासाठी गुरुवारी टीम इंडियाचे (Team India) खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा संघ सिडनी (Sydney) येथे गुरुवारी दाखल झाला. युएईमध्ये बायो-बबल सोडल्यानंतर आता सिडनी येथे आणखी एक बायो-बबलमध्ये त्यांनी प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाचा दौरा मोठा असल्याने आणि खेळाडूंना बबलमधून बाहेर पडून इतर कोणालाही भेटण्याची परवानगी नसल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटूंबाला बरोबर आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह काही खेळाडू त्यांच्या पत्नी व मुलांसह प्रवास करत आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएलमध्ये (IPL) यशस्वीरीत्या कामगिरी केली आणि 15 सामन्यात 13 विकेट घेतल्या. तो भारताच्या कसोटी संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि पत्नी प्रीती नारायणन (Prithi Narayanan) आणि मुली अखिरा अश्विन व आध्या अश्विनसमवेत सिडनी येथे क्वारंटाइन झाला आहे. (IND vs AUS 2020-21: ‘मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू’, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगरने केले विराट कोहलीचे कौतुक)

शुक्रवारी, या जोडप्याच्या लग्नाचा 9वा वाढदिवस होता आणि अश्विनची पत्नी प्रीतीने दोघांच्या फोटोंसह एक आनंददायक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ‘आम्हाला 9 वर्षाच्या शुभेच्छा. एकत्र क्वारंटाइन असण्यापेक्षा रोमँटिक आणखी काय असू शकते ज्यातून सुटण्याचा कोणताही मार्ग नाही?’ अश्विनने देखील आपल्या इंस्टाग्राम प्रीतीने शेअर केलेला पोस्ट रिपोस्ट केला आणि लिहिले: "वेळ पंख लावून उडतो!! 9 वर्षांत तशीच झाली." पाहा पोस्ट: 

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝒫𝓇𝒾𝓉𝒽𝒾 𝒜𝓈𝒽𝓌𝒾𝓃 (@prithinarayanan)

दरम्यान, 27 नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेपासून दौऱ्याची सुरुवात होईल. पण मालिका सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय अनिवार्य क्वारंटाइन कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना सिडनी येथे खेळला जाईल त्यानंतर दोन दिवसानंतर ते दुसर्‍या वनडे सामना देखील त्याच ठिकाणी खेळतील आणि तिसऱ्या सामन्यासाठी कॅनबेरा येथे जातील जिथे पहिला टी-20 सामने खेळला जाईल. त्यानंतर अंतिम दोन टी-20 सामन्यांसाठी खेळाडू सिडनीला परततील. दरम्यान, कसोटी संघातील खेळाडू कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी सिडनी येथे दोन चार-दिवसीय टूर सामने खेळतील.