IND vs AUS 3rd Test Day 2 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टेस्ट मॅच लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती
दिवासाखेर ऑस्ट्रेलियाने 2 विकेट गमावून 166 धावा केल्या आहेत आणि आता दुसऱ्या दिवशी यजमान संघाचे लक्ष मोठी धावसंख्या करण्याकडे असेल, मात्र भारतीय गोलंदाज देखील आपला प्रभावी मारा करण्यासाठी सज्ज असतील. दुसऱ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. शिवाय Sony LIV अॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल.
IND vs AUS 3rd Test Day 2 Live Streaming: सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील (Sydney Cricket Ground) तिसऱ्या कसौटी सामन्याच्या विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबूशेन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने पहिल्या दिवशी मॅचमध्ये वर्चस्व गाजवले. दिवासाखेर ऑस्ट्रेलियाने 2 विकेट गमावून 166 धावा केल्या आहेत आणि आता दुसऱ्या दिवशी यजमान संघाचे लक्ष मोठी धावसंख्या करण्याकडे असेल, मात्र भारतीय (India) गोलंदाज देखील आपला प्रभावी मारा करण्यासाठी सज्ज असतील. भारतीय वेळेनुसार सकाळी 5:00 वाजता तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होईल. भारतीय चाहते सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIV अॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (IND vs AUS 3rd Test Day 1: सिडनी टेस्टमध्ये पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया वरचढ, विल पुकोव्हस्की-मार्नस लाबूशेनच्या अर्धशतकाने दिवसाखेर संघाचा स्कोर 166/2)
ऑस्ट्रेलियाकडून दुखापतींनंतर पुनरागमन करणारा डेविड वॉर्नर अवघ्या 5 धावाच करू शकला तर भारताकडून मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आलं नाही. दुसऱ्या दिवशी टीम इंडिया गोलंदाजांवर आश्वासक मारा करण्याचा दबाव असेल तर ऑस्ट्रेलियन फलंदाज मेलबर्नमध्ये आपल्या खराब कामगिरीला मागे टाकत आपली खेळी सुधरवण्याच्या प्रयत्नात असतील. पहिल्या दिवशी नाबाद परतलेले लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ कांगारू संघासाठी दुसऱ्या दिवसाची सुसुवात करतील.
पहा भारत-ऑस्ट्रेलियाचा SCG मधील प्लेइंग इलेव्हन
भारत: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी.
ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन-विकेटकीपर), डेविड वॉर्नर, विल पुकोव्हस्की, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेजलवुड.
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2021 04:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

