IND vs AUS 2nd T20I Stats: टीम इंडियाने टी-20 मालिकेत मारली बाजी, पाकिस्तानचा मोडला रेकॉर्ड; जाणून घ्या मॅचमध्ये बनलेले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्

ऑस्ट्रेलियाला लोळवत विराटसेनेने पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. जाणून घ्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात बनलेले काही प्रमुख रेकॉर्डस्.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी- 20 (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd T20I Stats: कॅनबेरामध्ये (Canberra) पहिल्या टी-20 सामन्यात 11 धावांनी बाजी मारल्यानंतर, लागोपाठ दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज खेळ करत 6 विकेटने सिडनीच (Sydney) मैदान मारलं. ऑस्ट्रेलियाने (Australia) दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून (India) शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक पांड्या-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करत सामन्याचं चित्र बदललं. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने बाजी मारली आहे. कांगारू संघाने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ (Indian Team) मधल्या काही षटकांमध्ये अडचणीत सापडला होता, पण हार्दिक आणि श्रेयसच्या जोडीने फटकेबाजी करत कांगारुंच्या हातातला विजयाचा घास हिसकावून घेतला. या सामन्यात टीम इंडिया (Team India) खेळाडूंनी काही विक्रमांची नोंद केली आहे. (IND vs AUS 2nd T20I: सिडनीमध्ये हार्दिक पांड्याचा धमाका! ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने मात करत टीम इंडियाने मालिकेत मारली 2-0 ने बाजी )

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवत विराटसेनेने पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. जाणून घ्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात बनलेले काही प्रमुख रेकॉर्डस्:

1. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत युजवेंद्र चहल भारताचा आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा संयुक्तपणे पहिला गोलंदाजी बनला. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि चहलने प्रत्येकी 59 विकेट घेतल्या आहेत.

2. चहलने आजच्या सामन्यात 4 ओव्हर गोलंदाजी करत 51 धावा लुटवल्या. यासह आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तीनवेळा 50 हुन अधिक धावा लुटवणारा चहल एकमेव फिरकीपटू ठरला आहे.

3. शिखर धवनने सिडनी सामन्यात 52 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील धावांचे हे 11वे अर्धशतक आहे. धवनचे मागील तीन आंतरराष्ट्रीय टी-20 मधील दुसरे अर्धशतक आहे.

4. शिखर धवनआंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी 1600 धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला. धवनच्या आधी रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनी हा टप्पा गाठला आहे.

5. याशिवाय 52 धावांची अर्धशतकी खेळी करणार्‍या धवनने टी-20 स्वरूपात सर्वाधिक धावा करण्यास धोनी आणि रैनाला मागे सोडले आहे. धोनीने देशासाठी 98 टी-20 सामन्याच्या 85 डावांमध्ये 1617 धावा केल्या आहेत, तर 78 सामने खेळणार्‍या रैनाने 66 डावांमध्ये 1605 धावा केल्या.

6. टीम इंडियाने आजचा सामना जिंकत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा मोठा मोडला आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सलग 10वा विजय नोंदवला. पाकिस्तानने जुलै ते नोव्हेंबर 2018 दरम्यान सलग नऊ टी-20 सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. यापूर्वी, शुक्रवारी कॅनबेरा येथे झालेल्या विजयासह भारताने पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी केली होती. आणि आता त्यांनी सिडनी येथे सलग 10वा टी-20 सामना जिंकला.

7. हार्दिक पांड्याने फक्त 22 चेंडूत नाबाद 42 धावांची खेळी साकारली जी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

भारत-ऑस्ट्रेलियामधील पुढील सामना 8 नोव्हेंबर रोजी सिडनीमध्ये खेळला जाईल. या सामन्यात टीम इंडिया कांगारू संघाचा सफाया करू इच्छित असेल तर ऑस्ट्रेलियन संघ क्लीन स्वीप टाळण्याच्या प्रयत्नात असेल.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif