IND vs AUS 2nd ODI: SCG वर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा धमाका, विराट कोहलीने गाठला 22,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा, पाहा मॅचमध्ये बनलेले 'हे' रेकॉर्डस्

IND vs AUS 2nd ODI Stats: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय संघाविरुद्ध पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. विराट कोहलीने 22,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला तर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या पाच फलंदाजांनी पन्नास हुन अधिक धावांची नोंद केली. 

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 2nd वनडे (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 2nd ODI Stats: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) भारतीय संघाविरुद्ध (Indian Team) पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत ऑस्ट्रेलियन संघाने (Australian Team) दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार विजय मिळवला आणि मालिका 2-0 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत टीम इंडियाविरुद्ध (Team India) वनडेमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. आजच्या सामन्यातील पराभवासह विराटसेनेच्या मालिका विजयाचे स्वप्न भंग झाले, पण टीमने उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला कडू आव्हान दिले. टीम इंडिया सामना जिंकेल असे दिसत असताना कांगारू गोलंदाजांनी संघाला पुनरागमन करून दिले आणि मालिकेत बाजी मारली. भारताची सलामी जोडी स्वस्तात माघारी परतली असताना भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) , केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी जबरदस्त फलंदाजी केली, पण टीमला विजय मिळवून देण्यास ती पुरेशी ठरली नाही. (SCG वर भारत-ऑस्ट्रेलिया मॅच दरम्यान भारतीय तरुणाने ऑस्ट्रेलियन तरुणीला केलं प्रपोज, पाहा पुढे काय झालं Watch Video)

दरम्यान आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी काही विक्रमांची नोंदणी केली. जाणून घ्या...

1. विराट कोहलीने आजच्या सामन्यात शानदार अर्धशतकी डाव खेळत 22,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठला. हा पराक्रम करणारा विराट आठवा फलंदाज ठरला.

2. विराट कोहलीने वनडेमध्ये 102 वेळा 50 हुन अधिक धावा केल्या. आणि एलिट यादीत चौथे स्थान मिळवले. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर सर्वाधिक 145 वेळा 50 हुन अधिक धावा केल्या आहेत.

3. फलंदाजीत पहिल्या 5 फलंदाजांनी 50हुन अधिक धावा करण्याचीही फक्त दुसरी वेळ आहे. ऑस्ट्रेलियाचे पहिले पाच फलंदाज- डेविड वॉर्नर, आरोन फिंच, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी आजच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.

4. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजच्या तुफानी खेळीच्या जोरावर विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावा पूर्ण केल्या आणि सचिन तेंडुलकर व रोहित शर्मा यांच्या पंक्तीत स्थान मिळवलं. सचिनने 3077, रोहित शर्माने 2208 आणि विराटने 2020 धावा केल्या आहेत. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात कमी 34 डावांमध्ये 2000 धावा करणारा खेळाडू बनला आहे.

5. ऑस्ट्रेलियाने आजच्या सामन्यात भारताविरुद्ध 389/4 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. यापूर्वी, पहिल्या वनडे सामन्यात त्यांनी 374/6 अशी धावसंख्या नोंदवली होती, पण आजच्या सामन्यात त्याला मागे टाकत नवीन धावसंख्या नोंदवली.

6. 2020 मध्ये भारताने आतापर्यंत 8 वनडे सामने खेळले आहेत आणि त्यांच्यात पहिल्या विकेटसाठी सर्वात खराब गोलंदाजीची सरासरी 125.42 राहिली आहे म्हणजेच विरोधी संघाची पहिला विकेट घेण्यापूर्वी त्यांनी सरासरीने 125 धावा लुटवल्या.

7. आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने 58 अर्धशतक ठोकले आणि मोहम्मद अझरुद्दीनच्या 58 अर्धशतकांची बरोबरी केली आहे आणि भारतासाठी सर्वाधिक अर्धशतकाच्या बाबतीत तो पाचव्या स्थानी आला आहे.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना 2 डिसेंबर रोजी कॅनबेराच्या मनुका ओव्हल मैदानावर खेळला जाईल. या सामन्यात भारतासमोर क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान असणार आहे.