IND vs AUS 2020-21: ‘माही भाईने पॅटर्न सेट केला आहे’! रवींद्र जडेजाच्या कॅनबेरा अर्धशतकामागे होता एमएस धोनीचा फंडा, जाणून घ्या

अष्टपैलू रवींद्र जडेजाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला अर्धशतकाचे श्रेय दिले. धोनीबरोबर वर्षानुवर्षे भारत आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळल्यानंतर जडेजाने आपल्या माजी भारतीय कर्णधाराने ठरविलेल्या नमुन्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि मानुका ओव्हलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा फायदा करून घेण्याची जाणीव करून दिली.

IND vs AUS 2020-21: ‘माही भाईने पॅटर्न सेट केला आहे’! रवींद्र जडेजाच्या कॅनबेरा अर्धशतकामागे होता एमएस धोनीचा फंडा, जाणून घ्या
रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2020-21: अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) अर्धशतकाचे श्रेय दिले ज्याने बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरा (Canberra) येथे झालेल्या तिसर्‍या वनडे सामन्यात संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. पहिले फलंदाजी करताना टीम इंडिया 152/5 अशा अडचणीत सापडली होती आणि त्यांच्यावर कमी धावसंख्येची तलवार लटकत होती. पण जडेजा आणि पांड्याच्या सहाव्या विकेटसाठी नाबाद 150 हुन अधिक धावांच्या भागीदारीने भारताला आव्हानात्मक 302 धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाच्या लक्ष्यात 13 धावा कमी पडल्या आणि भारताने 0-3 असा क्लीन स्वीप टाळत मालिका 1-2 ने संपुष्टात आणली. सामन्यानंतर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी जडेजाने संवाद साधला आणि धोनीला त्याच्या कॅनबेरामधील अर्धशतकी खेळीसाठी श्रेय दिले. धोनी (MS Dhoni) आणि जडेजा भारतीय संघाऐवजी आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्समध्ये देखील एकत्र खेळत आहेत. (IND v AUS ODI 2020: वनडे मालिका गमावली पण टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'या' 5 गोष्टी ठरल्या फायदेमंद)

“माही भाईने भारत आणि चेन्नई (सीएसके) साठी बरेच क्रिकेट खेळले आहे. त्याने नेहमी एक पॅटर्न सेट केले होते. तो जायचा आणि फलंदाजाशी भागीदारी करण्याचा विचार करायचा. तो नेहमी स्वत: ला सेट ठेवत असे आणि मोठे शॉट्स खेळायला पाहत असे. तो अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा खेळला आहे,” जडेजाने म्हटले. धोनीबरोबर वर्षानुवर्षे भारत आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळल्यानंतर जडेजाने आपल्या माजी भारतीय कर्णधाराने ठरविलेल्या नमुन्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि मानुका ओव्हलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा फायदा करून घेण्याची जाणीव करून दिली. जडेजा आणि पांड्या यांनी नाबाद अर्धशतके झळकावली तर पांड्याने सामन्यात वनडेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदविली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony Sports (@sonysportsindia)

“त्याच्याकडे पाहून आणि मी त्याच्यासह बर्‍याचदा फलंदाजी करताना तो मला नेहमी म्हणायचा की जर शेवटपर्यंत आम्ही हे खेळू शकलो तर अंतिम चार-पाच षटकांत आम्ही बरेच धावा करू शकतो,” जडेजा पुढे म्हणाला. “आज तीच परिस्थिती होती आणि आज त्याने प्रयत्न केला. हार्दिक आणि मी चर्चा करीत होतो की आम्ही शेवटच्या काही ओव्हरमध्ये संधी मिळवू शकतो. एका बाजूला बाउंड्री लाईन कमी होती म्हणून ती योजना होती.”

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2020 01:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).