IND vs AUS 2020-21: टीम इंडियासाठी वाईट बातमी, 'हा' वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण दौऱ्यातून पडला बाहेर
भारताचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेल नेट सेशनच्या दरम्यान पायाच्या स्नायूच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियामधून मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. टी नटराजन आधीच मुख्य संघात असल्याने उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी हा फलंदाजांना मदत करण्यासाठी भारताचा नेट गोलंदाजीचा एकमेव पर्याय उरला आहे.
IND vs AUS 2020-21: भारताचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेल (Ishan Porel) नेट सेशनच्या दरम्यान पायाच्या स्नायूच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियामधून (Australia) मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या (BCCI) एका सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर PTIला सांगितले की, “ईशान पोरेलच्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली असून गेल्या काही दिवसांपासून तो भारतात आहे. पायाच्या स्नायूची दुखापत आहे परंतु त्याची पातळी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (National Cricket Academy) मूल्यमापन केल्यानंतरच कळू शकेल." थांगरसु नटराजन (टी नटराजन) आधीच मुख्य संघात असल्याने उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी (Kartik Tyagi) हा फलंदाजांना मदत करण्यासाठी भारताचा नेट गोलंदाजीचा एकमेव पर्याय उरला आहे. मुळात पोरेल, त्यागी, नटराजन आणि कमलेश नागरकोटी यांना नेट गोलंदाज म्हणून निवडले गेले होते. परंतु वर्कलोड व्यवस्थापनाची कमतरता असल्यामुळे त्याच्या संघाला ऑस्ट्रेलियाकडे जाण्यापूर्वीच नागरकोटीला बाहेर काढावे लागले. (IND vs AUS 3rd ODI: कॅनबेरामधील अंतिम वनडेत टीम इंडियाने मारली बाजी, यजमान ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकली मालिका)
आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसमवेत असलेल्या पोरेलला खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु रणजी आणि दुलीप ट्रॉफीमधील त्याच्या लाल बॉलच्या कामगिरीसह गेल्या हंगामात भारत अ संघाच्या न्यूझीलंड दौर्यात प्रभावी कामगिरीनंतर पोरेलची ऑस्ट्रेलियामध्ये नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली. यापूर्वी, पोरेलला 2018 मध्ये अंडर -19 विश्वचषकनंतर लांब दुखापतीचा ब्रेक मिळाला होता पण त्याने गेल्या घरगुती मोसमात पुनरागमन केले होते. “जर हा वर्ग 1 टिअर असेल तर पोरेलवर मुश्ताक अली ट्रॉफीला मुकण्याची शक्यता आहे जी बंगालसाठी वाईट बातमी आहे. आता बेंगलोरमध्ये त्यांचे पुनर्वसन कसे होते ते पहावे लागेल. आशा आहे की तो जास्त काळ बाहेर पडणार नाही,” सूत्रांनी म्हटले.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका 2-1ने गमावल्यावर भारतीय संघ आता टी-20 मालिकेसाठी सज्ज होत आहे. मालिकेचा पहिला सामना कॅनबेरामध्ये 4 डिसेंबर रोजी खेळला जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)