IND vs AUS 2020-21: रोहित शर्माची वनडे आणि टी-20 सलामीवीर म्हणून कोण घेणार जागा? टीम इंडियाकडे आहेत 'हे' 3 पर्याय
रोहित शर्माला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे, टी-20 मालिकेला मुकावे लागणार आहे. तो सध्या दुखापतीतून सावरत आहे आणि सलामी फलंदाजांची जागा घेऊ घेऊ शकणारे भारतीय संघाकडे तीन खेळाडूंचा पर्याय आहे. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सुरेख फॉर्मात आहेत आणि त्यांना पुन्हा सलामीला येण्याची संधी मिळू शकते.
IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा आपला दम दाखवताना दिसणार आहे, पण तो वनडे आणि टी-20 मालिकेत झळकणार नाही. आयपीएल 2020 मध्ये रोहितची दुखापत होणे ऑस्ट्रेलियामधील भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket Team) मोठा धक्का सिद्ध झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितने अद्भुत कामगिरी केली आहे आणि त्याची मोठी फलंदाजी खासकरुन पाच वेळाच्या चॅम्पियनसाठी राखीव आहे कारण त्याने वनडेच्या इतिहासात त्याच्याविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. रोहित भारतीय क्रिकेट संघाच्या आघाडीचा महत्वाचा खेळाडू आहे आणि शिखर धवनबरोबर भागीदारीमुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) वर्चस्व गाजवण्यास मदत मिळाली आहे याचा पुरावा म्हणजे गेल्या तीन वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने एकही मालिका गमावलेली नाही. 27 नोव्हेंबरपासून भारतीय क्रिकेट संघाचा दौरा सुरु होणार असताना रोहितची अद्याप रिक्त आहे.
दुखापतग्रस्त रोहितची जागा घेणारे असे काही संभाव्य खेळाडू आहे. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सुरेख फॉर्मात आहेत आणि त्यांना पुन्हा सलामीला येण्याची संधी मिळू शकते. पाहा टीम इंडियाकडे सलामीसाठी कोण-कोणते आहेत पर्याय...
1. मयंक अग्रवाल
न्यूझीलंडच्या 2020 दौऱ्यावर रोहितला दुखापतीमुळे वनडे मालिकेला मुकावे लागले आणि त्याच्या जागी मयंकला पदार्पणाची संधी मिळाली. अग्रवालचे वनडे क्रिकेटमधील पदार्पण अविस्मरणीय ठरले नाही. त्याने केवळ 36 धावा केल्या, त्याने आयपीएल 2020 च्या कामगिरीने चाहत्यांना प्रभावित केले ज्यामुळे त्याने पुन्हा एकदा वनडे संघात स्थान मिळवले. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघात पुन्हा एकदा स्थान मिळवणारा मयंकला आपल्या कामगिरीने मर्यादित ओव्हरमध्ये देखील आपले स्थान सुरक्षित करण्यात मदत होऊ शकेल.
2. केएल राहुल
रोहितची जागा घेण्यासाठीऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आलेला राहुल मोठा दावेदार आहे. वर्षाच्या सुरूवातीला न्यूझीलंड दौऱ्यावर यष्टीरक्षक-फलंदाज आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्मयामध्ये होता. वनडे मालिकेदरम्यान विराट कोहलीने त्याला मधल्या फळीत वापरले होते मात्र, युएईमध्ये आयपीएल 13 मध्ये राहुलच्या घातक कामगिरीनंतर राहुल पुन्हा मधल्या फळीत फलंदाजी करेल अशी शक्यता कमी आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याव्यतिरिक्त, राहुलला रोहितच्या अनुपस्थितीत स्थिरतेसाठी आवश्यक असलेला सलामी फलंदाजही असू शकतो.
3. शुभमन गिल
शुबमन, कोलकाता नाइट रायडर्सचा प्रमुख खेळाडू होता आणि यामुळे गिलला भारतीय संघात आणखी एक संधी मिळाली. युएईमध्ये दोनदा शुभमन सलामीला आला आणि तो त्यांचा सर्वात सातत्यपूर्ण फलंदाज होता, ज्याने 14 डावात 440 धावा केल्या. या हंगामात केकेआरसाठी शुमनने तीन अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान भारतीय फलंदाजीतील कलागुणांची खोली वाढविण्याच्या दृष्टीने शुभमन भारतीय वनडे संघात पुनरागमन करेल असे दिसत आहे.