IND vs AUS 2020-21: डेविड वॉर्नरच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये खेळण्यावर संभ्रम; 'ओपनरची दुखापत इतरांसाठी संधी', कोच Justin Langer यांचे विधान

cricket.com.auने दिलेल्या वृत्तानुसार लँगर यांनी सांगितले की, "त्याला ग्रोइन्समध्ये त्याच्या अब्दक्टरला दुखापत झाली आहे आणि त्यांनी सांगितले की ही फार वेदनादायक जखम आहे."

डेविड वॉर्नर (Photo Credit: Getty Images)

IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियाचा (Australia)  स्टार सलामी फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) तंदुरुस्त असेल आणि 17 डिसेंबर रोजी भारताविरुद्ध (India) होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी फिट असेल याची अपेक्षा कमी असल्याचे ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर (Justin Langer) यांनी सांगितले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले की अखेरचा एकदिवसीय आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला मुकावे लागणार आणि वॉर्नरला भारत कसोटी मालिकेसाठी फिट होण्याच्या लढाईचा सामना करावा लागणार असल्याचे सांगितले. रविवार, 29 नोव्हेंबर रोजी क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला अस्वस्थ वाटल्यावर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. नंतर त्याला स्कॅनमधून असे कळले की त्याला ग्रोईन स्ट्रेन झाल्याचे समोर आले. cricket.com.auने दिलेल्या वृत्तानुसार लँगर यांनी SENच्या स्पोर्ट डेच्या WA ला सांगितले की, "त्याला ग्रोइन्समध्ये त्याच्या अब्दक्टरला दुखापत झाली आहे आणि त्यांनी सांगितले की ही फार वेदनादायक जखम आहे." (IND vs AUS ODI 2020-21: ‘तुझी खेळभावना कुठे गेली?’, डेविड वॉर्नरच्या दुखापतीवर KL Rahul याच्या विधानावर सोशल मीडिया यूजर्सने फलंदाजाची घेतली क्लास)

"आम्ही नुकतेच कॅनबेराला आलो आहोत. म्हणून सिडनीला परत येईपर्यंत आम्ही त्याला कदाचित पाच ते सहा दिवस पुन्हा दिसणार नाही." पहिल्या कसोटी सामन्यासाठी वॉर्नरच्या खेळण्यावर संशय असल्याचे लॅंगर यांनी सांगितले. सलामीवीर जो बर्न्स आणि विल पुकोव्हस्की यांच्यात होणाऱ्या कसोटी निवडीची लढाई “थोडासा दबाव काढून टाकते” असेही लॅंगरने म्हटले. "मी माझा श्वास रोखत नाही की तो पहिल्या कसोटी सामन्यासाठी तयार आहे, परंतु म्हटले की तो उच्चभ्रू व्यावसायिक आहे आणि त्यासाठी तयार होण्यासाठी अक्षरशः सर्वतोपरी प्रयत्न करेल," लॅंगर म्हणाले. दरम्यान, वॉर्नरच्या अनुपस्थितीत कसोटी मालिकेत सलामीला कोण येणार यावर लँगर यांनी स्पष्टीकरण दिले.

लँगर म्हणाले की, "कसोटी सामन्यांमधील जो फलंदाज 'ऑस्ट्रेलिया अ' संघाकडून भारताविरुद्ध सराव सामन्यात सर्वोत्तम फलंदाजी करेल, तो आगामी कसोटी मालिकेत सलामीवीर म्हणून वॉर्नरच्या जागी पहिली पसंती असेल." ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय मालिकेतील विजयामध्ये वॉर्नरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असताना, यजमान संघात त्याची जागा घेण्यासाठी प्रतिभावान फलंदाजांची कमी नाही. अ‍ॅडिलेडमध्ये दिवस/रात्र कसोटी सामन्यासह 17 डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.