IND vs AUS 1st ODI Likely Playing XI: शिखर धवनसह मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी कोणता फलंदाज येणार सलामीला? पाहा कसा असेल टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन

विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण दौरा सुरू करण्यास उत्सुक आहे. पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताचा प्लेइंग इलेव्हन कसा असेल याची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित ओव्हरच्या मालिकेत रोहित शर्मा नसल्याने त्याच्या जागी शिखर धवनसोबत केएल राहुल सलामीला येण्याची मोठी शक्यता आहे. पाहा पहिल्या वनडेसाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन.

Team India (Photo Credits: Twitter/BCCI)

IND vs AUS 1st ODI Likely Playing XI: विराट कोहलीची टीम इंडिया (Team India) आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी जबाबदारी म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण दौरा सुरू करण्यास उत्सुक आहे. युएईमधील इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13व्या सत्रानंतर भारतीय संघाचे (Indian Cricket Team) प्रतिनिधित्व करणारे खेळाडू यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसह आंतरराष्ट्रीय सर्किटवर परतणार आहेत.तीन मालिकेच्या सामन्यातील पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. या मालिकेसह भारतीय क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सत्र सुरु होईल जे मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थांबवण्यात आले होते. या दौऱ्यावरून प्रेक्षकही स्टेडियममध्ये परतणार असतील. यापूर्वी, इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट आयोजित करण्यात आले होते, मात्र त्यावेळी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी मिळाली नव्हती. दरम्यान, पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताचा प्लेइंग इलेव्हन (India Playing XI) कसा असेल याची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. (IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात Down Under 'या' 5 भारतीयांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा, विराट कोहलीही यादीत सामील)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित ओव्हरच्या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळणार नसल्याने त्याच्या जागी शिखर धवनसोबत (Shikhar Dhawan) केएल राहुल (KL Rahul) सलामीला येण्याची मोठी शक्यता आहे. राहुलला संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आले असून तो मालिकेत विकेटकीपरची देखील भूमिका बजावेल. कर्णधार विराट कोहली तिसऱ्या तर श्रेयस अय्यर चौथ्या स्थानावर फलंदाजी करेल. तर, पाचव्या स्थानासाठी शुभमन गिल आणि मनीष पांडे यांच्यामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा संघातील ऑल-राउंडर खेळाडू असतील. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी हे तीन वेगवान गोलंदाजी विभाग सांभाळतील, तर युजवेंद्र चहल एकमेव फिरकी गोलंदाज असेल.

पाहा पहिल्या वनडेसाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शिखर धवन, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे/शुभमन गिल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now