IPL Auction 2025 Live

IND vs AUS 1st ODI: 'Butta Bomma' गाण्यावर मैदानावरच थिरकाला डेविड वॉर्नर, पाहून उत्साहित चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया, पहा मजेदार Video

वॉर्नरने चाहत्यांच्या आग्रहावर त्यांना गाण्यामधील काही डान्स स्टेप्स करून दाखवल्या ज्यावर उत्साहित प्रेक्षकांनी त्याचे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

डेविड वॉर्नर बुट्टा बोमा सॉन्ग (Photo Credit: Twitter)

David Warner Dances on Butta Bomma Song: कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात ऑस्ट्रेलियन सलामी फलंदाज डेविड वॉर्नरचे (David Warner) TikTok व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले होते. त्यातून दक्षिण भारतीय अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) Butta Bomma गाण्यावरील त्याचा डान्स चाहत्यानां फारच पसंत पडला आणि तो आजही त्यांच्या लक्षात राहिलेला आहे. याचा पुरावा म्हणजे भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान मैदानावर वॉर्नर या गाण्यावर थिरकला. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर पहिल्यांदा चाहत्यांना स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्याची संधी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करून भारतासमोर 375 धावांचे विशाल लक्ष्य दिले होते. भारताच्या फलंदाजी दरम्यान वॉर्नर सीमारेषे जवळ क्षेत्ररक्षण करत होता. जेव्हा वॉर्नरने चाहत्यांच्या आग्रहावर त्यांना गाण्यामधील काही डान्स स्टेप्स करून दाखवल्या ज्यावर उत्साहित प्रेक्षकांनी त्याचे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. (IND vs AUS 1st ODI: शिखर धवन, हार्दिक पांड्याची झुंज व्यर्थ, टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाची मालिकेत 1-0 ने आघाडी)

वॉर्नरच्या या डान्सचा व्हिडिओ एका ट्विटर यूजरने सोशल मीडियावर पोस्ट केला ज्याला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. पहिल्या एकदिवसीय दरम्यान चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी वॉर्नरने गाण्यांच्या छोट्या छोट्या स्टेप्स करताना दिसला. दरम्यान, आजच्या सामन्यात वॉर्नरने कर्णधार आरोन फिंचच्या साथीने संघाला वेगवान सुरुवात करून दिली. दोघांमध्ये दीडशे धावांची भागीदारी झाली ज्यामुळे अखेरीस यजमान संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. दरम्यान, पाहा वॉर्नरचा डान्सचा हा मजेदार व्हिडिओ:

दुसरीकडे, मॅचबद्दल बोलायचे तर ऑस्ट्रेलियन संघाने शानदार सुरुवातीच्या बळावर भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य दिले. याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने सभ्य कामगिरी बजावली आणि 308 धावांपर्यंत मजल मारली. शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी झुंजार अर्धशतक ठोकले, पण ते संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले. हार्दिकने सर्वाधिक 90 तर धवनने 74 धावा केल्या. पण भारतीय संघ अ‍ॅडम झँपा आणि जोश हेजलवुडच्या गोलंदाजीपुढे निरुत्तरात दिसले. मयंक अग्रवाल 22, कर्णधार विराट कोहली 21 आणि उपकर्णधार केएल राहुल 12 धावांचं करू शकले. शिवाय, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा यथेच्च समाचार घेतला आणि त्यांच्या धुलाई केली.