MLC 2025 News : मेजर लीग क्रिकेटमध्ये शाहरुख च्या टीमने निवडला नवा कर्णधार; 'या' खेळाडूच्या गळ्यात नेतृत्वाची माळ
मेजर लीग क्रिकेट 2025 चे काउंटडाउन सुरू झाले आहे. उद्या 13 जूनपासून या लीगचा तिसरा हंगाम सुरू होत आहे. त्यापूर्वी नवीन कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे.
Jason Holder new captain of Los Angeles Knight Riders: मेजर लीग क्रिकेट (MLC) 2025 चे काउंटडाउन सुरू झाले आहे. या लीगचा तिसरा हंगाम 13 जूनपासून सुरू होणार आहे. त्याच वेळी, या हंगामापूर्वी काही संघांनी नवीन कर्णधारांची घोषणा केली आहे. या यादीत लॉस एंजेलिस नाईट रायडर्स (Los Angeles Knight Riders) संघाचे नाव देखील आहे. जो नाईट रायडर्स ग्रुपचा एक फ्रँचायझी संघ आहे. या संघाचा मालक बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आहे. लॉस एंजेलिस नाईट रायडर्सने एका खेळाडूला संघाचा कर्णधार बनवले आहे. मात्र, तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये लीगचा भाग राहणार नाही.
नवा कर्णधार कोण?
लॉस एंजेलिस नाईट रायडर्सने वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरकडे आपले कर्णधारपद सोपवले आहे. पण, होल्डर आंतरराष्ट्रीय करारांमध्ये व्यस्त असल्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे काहीकाळ त्याच्या जागी अनुभवी फिरकी गोलंदाज सुनील नरेन संघाची जबाबदारी सांभाळेल. 17 जून रोजी ओकलँडमध्ये वॉशिंग्टन फ्रीडम विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी जेसन संघात सामील होईल.
जेसन होल्डर वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेत त्याच्या संघाकडून खेळताना दिसेल, ज्यामुळे तो एमएलसीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत, सुनील नरेन संघाचे नेतृत्व करतील. नरेनच्या नेतृत्वाखाली संघाला मजबूत सुरुवातीची आशा आहे. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली संघाची रणनीती यावर सर्वांचे लक्ष असेल.
लॉस एंजेलिस नाइट रायडर्स संघ: जेसन होल्डर (कर्णधार), सुनील नरेन, ॲलेक्स हेल्स, सईद बदर, नितीश कुमार, रोवमन पॉवेल, उन्मुक्त चंद, आंद्रे फ्लेचर, शेरफेन रदरफोर्ड, आदित्य गणेश, कॉर्न ड्राय, एनरिक नॉर्टजे, अली खान, तन्वीर संघा, आंद्रे रसेल, शेडली व्हॅन शाल्क्विक, कारथ ट्रोम्पल.
(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 10:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

