IIT Baba Troll After Ind vs Pak Match: टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटी बाबाच भाकीत ठरल खोट; नेटकऱ्यांनी चांगल सुनावल

टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटी बाबाला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय. नेटकऱ्यांनी या बाबाला चांगलंच सुनावलंय.

PC-X

IIT Baba Troll After Ind vs Pak Match: प्रयागराजमधील महाकुंभ 2025 मध्ये प्रसिद्ध झालेला आयआयटी बाबा (IIT Baba) उर्फ अभय सिंह आता त्याच्या एका भाकितामुळे आणखी चर्चेत आला आहे. महाकुंभ 2025 सुरू झाल्यापासून आयआयटी बाबाची सोशल मीडियावर मोठी क्रेझ पाहायला मिळाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर आयआयटी बाबाने टीम इंडिया विरुद्ध-पाकिस्तान सामन्याबाबत भविष्यवाणी केली होती. टीम इंडिया हा सामना गमावणार असं भाकीत आयआयटी बाबाने केलं होतं. मात्र हा आयआयटी बाबा काही तासांतच तोंडावर आपाटला. टीम इंडियाने 23 फेब्रुवारीला दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने दणदणीत विजय (IND beat PAK) मिळवला आहे. टीम इंडियाच्या या विजयानंतर या नेटकऱ्यांकडून या बाबाचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे. (India Victory Celebration In Street: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानवरचा शानदार विजय, देशवासीयांनी रस्त्यावर साजरा केला आनंद; पाहा व्हिडिओ)

आयआयटी बाबाची भविष्यवाणी

“मी तुम्हाला आधीच सांगतो या वेळेस टीम इंडिया जिंकणार नाही”, असं म्हणत आयआयटी बाबाने भविष्यवाणी केली होती. आयआयटी बाबाच्या या भविष्यवाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा बाबा तेव्हापासूनच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होता. कधी टीम इंडिया जिंकते आणि या बाबाला आम्ही टप्प्यात घेतो? याची प्रतिक्षाच नेटकऱ्यांना होती. टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि नेटकऱ्यांनी या बाबाकडे आपला मोर्चा वळवला. नेटकऱ्यांनी आपआपल्या पद्धतीने या बाबाला सुनावलंय. नेटकऱ्यांनी 'आता याला सोडायचं नाही', असं म्हणत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

'आज पाकिस्तानपेक्षा जास्त शिव्या या आयआयटी बाबाला पडत आहेत', असं एकाने म्हटलं आहे. 'विराटला नावं ठेवणाऱ्या या बाबाला विराटने शतकी खेळी करुन उत्तर दिलं आहे. आता तुम्ही या बाबाला नेमकं काय म्हणाल?', असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे. 'आयआयटी बाबाने गांजा जरा जास्त ओढला असावा वाटतं', असंही काही नेटकरी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर म्हणताना दिसत आहेत. 'आयआयटी बाबा पाखंडी आहे', असंही काहीजण म्हणत त्याला ट्रोल करत आहेत. आयआयटी बाबाने जे सांगितलं त्याला म्हणतात 'आपल्या हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेणं', असंही काही लोक म्हणत आहेत.

दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला 49.4 ओव्हरमध्ये 241 धावांवर रोखलं. त्यामुळे भारताला विजयासाठी 242 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान विराट कोहली याचं नाबाद शतक आणि श्रेयस अय्यर याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. भारताने 42.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 244 धावा केल्या. भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now