ICC WTC 2021-23: टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा; जसप्रीत बुमराह बनला नंबर 1, तर ऋषभ पंत याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पछाडलं

ICC World Test Championship 2021-2023: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम आहे. जसप्रीत बुमराह या चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे, तर ऋषभ पंतने आपल्या झंझावाती खेळीच्या जोरावर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मागे टाकत टॉप-5 फलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे.

ICC WTC 2021-23: टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा; जसप्रीत बुमराह बनला नंबर 1, तर ऋषभ पंत याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पछाडलं
जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत (Photo Credit: PTI)

World Test Championship 2021-2023: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम आहे. जसप्रीत बुमराह  (Jasprit Bumrah) या चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे, तर ऋषभ पंतने (Rishabh Pant) आपल्या झंझावाती खेळीच्या जोरावर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना मागे टाकत टॉप-5 फलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. बुमराहने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या डावात त्याने आतापर्यंत एक विकेट घेतली आहे. दुसरीकडे, पंतबद्दल बोलायचे तर श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात 39 धावा केल्यानंतर त्याने दुसऱ्या डावात 28 चेंडूत अर्धशतक ठोकून इतिहास रचला. पंत आता भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे, तर दिवस/रात्र कसोटीत तो अर्धशतकी पल्ला गाठणारा वेगवान फलंदाज आहे. (IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंका गोलंदाजांचा समाचार घेत Rishabh Pant याने इतिहास रचला, बनला सर्वात जलद टेस्ट अर्धशतक ठोकणारा भारतीय फलंदाज)

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीत बुमराह 9 सामन्यांत 38 विकेट्स घेऊन अव्वल स्थानावर आहे. बुमराहने तीनवेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत आणि यादरम्यान त्याची सर्वोत्तम कामगिरी 24 धावांत 5 विकेट आहे, जी त्याने अलीकडेच श्रीलंकेविरुद्ध नोंदवली. विशेष म्हणजे बुमराह सोबत मोहम्मद शमी देखील टॉप 5 गोलंदाजांमध्ये आहे. शमीने आतापर्यंत 30 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच इतर तीन खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडचा ऑली रॉबिन्सन 32 विकेट्ससह दुसऱ्या, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी 31 आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा 30 विकेट्स घेऊन अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्ध पहिले मोहाली आणि नंतर बेंगलोर कसोटी सामन्यात निराशाजनक खेळीचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना जोरदार फटका बसला आहे. दोघे धुरंधर फलंदाज जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंच्या यादीतून बाहेर घसरले आहेत. तर भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत 517 धावांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत केएल राहुल 541 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, जो रूट पुन्हा एकदा सर्वाधिक 1008 धावांसह अव्वल स्थानावर असून पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीत शतक झळकावणाऱ्या उस्मान ख्वाजानेही 512 धावांसह अव्वल 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2022 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).