ICC World Cup 2019: विश्वचषकमधून बाहेर पडल्यानंतर नवीन 'Mauka-Mauka' ऍडद्वारे टीम इंडियाला मानवंदना, पहा (Video)

या जाहिरातीमध्ये पाकिस्तानी चाहता सेमीफाइनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचा आनंद लुटलाताना दिसतोय.

मौका-मौका जाहिरात (Photo Credits: Youtube)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पराभवानंतर भारतीय संघाचे (Indian Team) यंदाच्या स्पर्धेत आव्हान संपुष्टात आले. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या निराशाजनक खेळीने चाहते निराश आहे पण आपल्या क्रिकेट संघाचा उत्साह वाढवत त्यांच्या प्रभुत्वपूर्ण कामगिरीसाठी त्यांचे अभिनंदन करत आहे. विराटसेना ने साखळी सामन्यात 8 पैकी 7 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका (South Africa), ऑस्ट्रेलिया (Australia), आणि पाकिस्तान (Pakistan) सारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत सेमीफायनल गाठले. आणि आता, विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यावर, टीम इंडियाला एक नवीन "मौका-मौका" जाहिरातीद्वारे चाहत्यांनी मानवंदना दिले आहे. (IND vs NZ: न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनलमध्ये पराभवानंतर रवींद्र जडेजा याची स्थिती कशी होती, सांगतेय त्याची पत्नी रिवाबा)

या जाहिरातीमध्ये पाकिस्तानी चाहता सेमीफाइनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचा आनंद लुटलाताना दिसतोय. "आम्ही संपूर्ण विश्वचषक चॅम्पियन्ससारखे खेळलो," भारतीय समर्थक पाकिस्तानी चाहत्यांला या 2 मिनिटांच्या 48 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतोय. "साखळी फेरीत आम्ही इतर संघाच्या परिणामांवर अवलंबून नव्हतो," असे त्यांनी विश्वचषक नॉकआउट राऊंडमध्ये पाकिस्तानच्या संदर्भात स्पष्टपणे सांगितले.

"आम्ही एक विजेता संघ आहे जो विरोधी संघाला त्यांच्या अस्तित्वाबद्दल पुन्हा विचार करण्यास प्रवृत्त करतो. त्या दिवशी आमच्या नशिबाने साथ दिली नाही, अन्यथा नंबर 7 पुन्हा रडला असता," तो पाकिस्तानी चाहत्यांना म्हणाला. पाकिस्तानी चाहत्यानी विचारले असता, की भारतीय चाहते विजयी होण्याआधीच का मिरवतात यावर भारतीय चाहत्यांनी उत्तर दिले: विजयी झाल्यावर प्रत्येकजण आपल्या संघाचा उत्साह वाढवतात आणि आणि पराभवानंतर टीका करतात. मात्र, आम्ही भारतीय भिन्न आहोत आणि आमच्या संघाचा उत्साह वाढवण्याची शैली देखील वेगळी आहे. जिंकण्याआधी आम्ही विपक्ष संघाचा मार्ग उघडतो आणि हरलो तरी 'भारत, भारत' असे म्हणतो.