ICC World Cup 2019: टीम इंडिया बांगलादेश, श्रीलंका विरुद्ध मुद्दाम हरणार, पाकिस्तानी बसीत अली याचा भारतावर मॅच फिक्सिंगचा आरोप
अली म्हणाले, पाकिस्तानला सेमीफाइनलच्या रेस मधू बाहेर करण्यासाठी भारतीय संघ, श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्धचा सामना मुद्दाम हरणार.
भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) मधील विश्वकप सामना 16 जूनला खेळाला गेला. या सामन्यात टीम इंडिया ने पाकिस्तानला चारो खाणे चित्त करत विजय मिळवला. संघाने डकवर्थ लुईस (Duckworth/Lewis) नियमानुसार 86 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर, पाकिस्तानने न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध शानदार वापसी केली. आता त्यांची इच्छा आहे की भारताने इंग्लंड (England) ला त्यांच्या पुढच्या मॅच हरवावे जेणेकरून इंग्लंडचे विश्वकपमधील आव्हान संपुष्टात येईल. मात्र, या सामन्याआधी, पाकिस्तानचे माजी फलंदाज आणि गोलंदाज बसित अली (Basit Ali) ने टीम इंडिया वर मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. (ICC World Cup 2019: माइकल वॉन म्हणाला जो कोणी या संघाचा पराभव करेल तोच विश्वकप चा खरा दावेदार)
अली म्हणाले, पाकिस्तानला सेमीफाइनलच्या रेस मधू बाहेर करण्यासाठी भारतीय संघ, श्रीलंका (Sri Lanka) आणि बांगलादेश (Bangladesh) विरुद्धचा सामना मुद्दाम हरणार. अलीने एका लाईव्ह टीव्ही शो दरम्यान हे भाष्य केले. एआरवाय (ARY) न्यूजवर अली म्हणाले, "पाकिस्तान सेमीफायनल मध्ये पोहचावा असे भारतीय संघाला मुळीच वाटत नाही. भारताने पाच सामने खेळले आहेत. अद्याप त्यांचे बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध सामना होणे बाकी आहे. सगळ्यांनी बघितले त्यांनी अफगाणिस्तान ला नमवलं..."
"ते असे खेळतील की ज्याने कोणालाच कळणार नाही काय झालं. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात काय झाले? ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध भारताने काय केले? डेव्हिड वॉर्नर (David Warner) ने काय केले? अली ने विचारले. दरम्यान, अलीने दावा केला की भारत अफगाणिस्तान (Afghanistan) विरूद्ध बेईमानपणे खेळाला आणि वॉर्नरने भारतविरूद्ध जाणूनबुजून खराब कामगिरी केली.
सध्या अलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. आपली क्रिकेट करिअरमध्ये बसित अलीवर मॅच फिक्सिंगमध्ये अडकले होते. दरम्यान, 7 गुणांसह पाकचा संघ 6 व्या क्रमांकावर आहे. पाकचे अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरोधात 2 सामने बाकी आहेत. जर, पाकिस्तान दोन्ही सामने जिंकले तर, त्यांचे 11 गुण होतील.