ICC Women’s World Cup: विश्वचषकातून टीम इंडियाच्या एक्झिटनंतर निराश Mithali Raj हिने निवृत्तीचे दिले संकेत, पहा काय म्हणाली दिग्गज क्रिकेटपटू

क्राइस्टचर्च येथील धक्कादायक पराभवानंतर 38 वर्षीय दिग्गज भारतीय फलंदाजाने निवृत्तीचे संकेत दिले.

मिताली राज (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

भारताची दिग्गज कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिने महिला विश्वचषक (Women's World Cup) स्पर्धेतून टीम इंडिया (Team India) लवकर बाहेर पडल्यानंतर सामन्यानंतरच्या सादरीकरणात निवृत्तीचे संकेत दिले. 39 वर्षीय कर्णधार रविवारी क्राइस्टचर्च (Christchurch) येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या अंतिम गट सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) शेवटच्या षटकात झालेल्या थरारक सामन्यात भारताच्या पराभवाने ती निराश झाली. यासह आता मिताली 6 विश्वचषक खेळलेल्या आपल्या प्रसिद्ध कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. प्रभावशाली भारतीय कर्णधाराने 2017 विश्वचषकच्या अंतिम फेरीत संघाचे नेतृत्व केले होते परंतु यावेळी भारत त्यांच्या दिग्गज कर्णधाराला योग्य निरोप देऊ शकला नाही. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या षटकात नाट्यमय सामन्यात 275 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून मिताली आणि कंपनीचे सेमीफायनलचे स्वप्न धुळीस मिळवले. (INDvsSA WWC 2022: टीम इंडियाचे वर्ल्डकपमधून पॅकअप, दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने वेस्ट इंडिजची सेमीफायनलमध्ये धडक)

दरम्यान, दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धचा धक्कादायक पराभव मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या गौरवशाली कारकिर्दीचा शेवट असू शकतो. भारतीय संघाच्या या दोन वरिष्ठ खेळाडूंनी विश्वचषकापूर्वी ची भारतीय रंगातील शेवटची स्पर्धा असू शकते असे संकेत दिले होते. पराभवानंतर बोलताना मिताली म्हणाली, “सगळं काही संपायला हवं, भावनांना निवळायला वेळ लागेल पण खेळ आहे. सामना बघण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचे आभार, तुमचा जयजयकार ऐकून आनंद वाटला आणि भविष्यात मुलींना व भारतीय महिला संघाला पाठिंबा देत राहा.” “झुलन गोस्वामी हीच्या अनुभवाचा आणखी खूप फायदा झाला सता, पण इतर मुलींसाठी हे एक एक्सपोजर होते,” मिताली पुढे म्हणाली. महिला क्रिकेटमध्ये अग्रगण्य धावा करणाऱ्या कर्णधाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तणावपूर्ण परिस्थितीतही संघाचे प्रयत्न आणि कधीही हार-न मानण्याच्या वृत्तीबद्दल त्यांचे कौतुक केले.

“मला वैयक्तिकरित्या वाटते की मुलींनी हे सर्वतोपरीने प्रयन्त केले, हा एक महत्त्वाचा सामना होता, एक चांगला खेळ होता. यामुळे आमची मोहीम संपली, परंतु मुलींनी आतापर्यंत खेळल्याबद्दल मला अभिमान आहे. आमच्याकडे असलेल्या गोलंदाजांसह, मला वाटले की 275 ही चांगली धावसंख्या आहे, आ यापूर्वी अशाच धावसंख्येचा बचाव केला होता,” ती पुढे म्हणाली. दरम्यान, 1999 मध्ये पदार्पण करणाऱ्या मितालीने 231 एकदिवसीय सामने खेळले आणि 7737 धावा ठोकल्या, जो की महिला एकदिवसीय विक्रम आहे. यादरम्यान मितालीने 7 शतके ठोकली आहेत. याशिवाय तिने 12 कसोटी आणि 89 टी-20 सामने खेळले.