ICC Women's T20 World Cup 2024: महिला टी 20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज कोण? पहा संपूर्ण यादी
भारताचा पहिला सामना 4 ऑक्टोबर रोजी होईल. संयुक्त अरब अमिरातीमध्ये टी-20 विश्वचषक 2024 आयोजन करण्यात आले आहे. भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीवर नजर टाकूयात.
ICC Women's T20 World Cup 2024: आगामी महिला टी20 विश्वचषक (ICC Women's T20 World Cup 2024) साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. 27 ऑगस्ट रोजी बीसीसीआयने संघाची घोषणा केली. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपदाची कमान सोपवण्यात आली आहे. तर स्मृती मानधना संघाची उपकर्णधार आहे. महिला निवड समितीने 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. यावर्षी विश्वचषक यूएईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेचा हा नववा हंगाम 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दुबई आणि शारजाह येथे खेळवला जात आहे. आता पुन्हा एकदा युएईमध्ये जेतेपदासाठी स्पर्धा होत आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसह अ गटात ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा: Ravindra Jadeja 300 Wickets in Test Cricket: कानपूर कसोटीत रवींद्र जडेजाचा भीम पराक्रम! ठरला पहिला आशियाई गोलंदाज)
टीम इंडियाचा 4 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर 6 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. अशा परिस्थितीत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांवर नजर टाकूया.
या भारतीय फलंदाजांनी टी 20 विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या आहेत:
मिताली राज: टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राज ही महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज आहे. मिताली राजने 2009 च्या टी-20 विश्वचषकात पहिला सामना खेळला होता. त्यावेळी 24 सामने खेळले. 23 डावांत 40.33 च्या सरासरीने 726 धावा केल्या होत्या. मिताली राजचा स्ट्राईक रेट 97.31 होता. मिताली राजने टी 20 विश्वचषकात 5 अर्धशत झळकावली होती. सर्वोत्तम धावसंख्या 57 धावा होत्या.
हरमनप्रीत कौर: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हरमनप्रीतने 2009 मध्ये टी-20 विश्वचषकात पहिला सामना खेळला होता. 2018मध्ये शतक झळकावले होते. हरमनप्रीत कौरने आतापर्यंत 35 सामने खेळले आहेत. 29 डावांमध्ये 20.57 च्या सरासरीने आणि 107.66 च्या स्ट्राईक रेटने 576 धावा केल्या होत्या. टी-20 विश्वचषकात 2 अर्धशतकांसह हरमनप्रीत कौरने 1 शतकही झळकावले आहे. हरमनप्रीत कौरचा T20 विश्वचषकातील सर्वोत्तम धावसंख्या 103 धावा आहे.
स्मृती मानधना: टीम इंडियाची स्टार ओपनिंग बॅट्समन स्मृती मानधना ही आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तिसरी खेळाडू आहे. स्मृती मंधानाने 2014 साली पहिला टी 20 विश्वचषक सामना खेळला होता. 21 सामन्यांत 22.45 च्या सरासरीने 118.46 च्या स्ट्राईक रेटसह 449 धावा केल्या आहे. या काळात स्मृती मंधानाने ३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याचवेळी स्मृती मानधनाची सर्वोत्तम धावसंख्या ८७ धावांची होती.