ICC Women's T20 World Cup 2024 All Squads: भारतासह या देशांनी आयसीसी महिला T20 विश्वचषकासाठी त्यांचे संघ केले जाहीर, सर्व संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी पहा येथे
T20 क्रिकेटमधील अंतिम ट्रॉफीसाठी जगातील सर्वोत्कृष्ट संघ एकमेकांशी झुंजत असताना 10 संघ UAE च्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि शारजाह क्रिकेट स्टेडियम या दोन ठिकाणी 18 ॲक्शन-पॅक्ड दिवसांमध्ये 23 सामने खेळतील.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीचे आयोजन दुबई आणि शारजाहमध्ये केले जाईल, बांगलादेशमधून यूएईमध्ये टूर्नामेंट हलवण्याचा निर्णय आयसीसी बोर्डाने 20 ऑगस्ट रोजी झालेल्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला. भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ सामना 6 ऑक्टोबर रोजी दुबई येथे होणार आहे. (हेही वाचा - आता WTC फायनलचे ठिकाण बदलणार? आयसीसीचे चेअरमन बनल्यानंतर Jay Shah घेणार मोठा निर्णय)
T20 क्रिकेटमधील अंतिम ट्रॉफीसाठी जगातील सर्वोत्कृष्ट संघ एकमेकांशी झुंजत असताना 10 संघ UAE च्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि शारजाह क्रिकेट स्टेडियम या दोन ठिकाणी 18 ॲक्शन-पॅक्ड दिवसांमध्ये 23 सामने खेळतील. या मेगा टूर्नामेंटसाठी भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. जे खाली दिले आहे.
ग्रुप ए(Group A)
ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: ॲलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍश गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा (उप-कर्णधार), सोफी मॉलिनक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट , ॲनाबेल सदरलँड, तायला व्लामिनक, जॉर्जिया वेयरहम
भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया (फिटनेसच्या अधीन), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह, दयालन हेमलता, ए शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील (फिटनेसवर ठरणार), सजना सजीवन.
न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, अमेलिया केर, जेस केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे, ली तहहू
पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोज, इरम जावेद, मुनिबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमैमा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल (फिटनेस, सिद्रा अमीन, सईदा अरुब शाह , तस्मिया रुबाब , तुबा हसन
ग्रुप बी(Group B)
बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: संघ अद्याप जाहीर झालेला नाही
इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: इंग्लंड संघ: हीदर नाइट (कर्णधार), लॉरेन बेल, माया बाउचियर, ॲलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, डॅनियल गिब्सन, सारा ग्लेन, बेस हीथ (विकेटकीपर), एमी जोन्स (विकेटकीपर) ), फ्रेया केम्प, नेट सायव्हर-ब्रंट, लिन्से स्मिथ, डॅनी व्याट
स्कॉटलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: कॅथरीन ब्राइस (कर्णधार), सारा ब्राइस (उप-कर्णधार), लोर्ना जॅक-ब्राऊन, ॲबे एटकेन-ड्रमंड, अबताहा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लो एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅकॉल, डार्सी कार्टर, आयल्सा लीस्टर , हॅना रेनी, रेचेल स्लेटर, कॅथरीन फ्रेझर, ऑलिव्हिया बेल
दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ॲने डर्कसेन, मिके डी रिडर, अयांडा ह्लुबी, सिनालो जाफ्ता, मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, सुने लुस, नॉनकुलुलेको म्लाबा , तुमी सेखुखुणे
वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ: हेली मॅथ्यूज (कर्णधार), आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, डिआंड्रा डॉटिन, शमाइन कॅम्पबेल (उप-कर्णधार, विकेटकीपर), अश्मिनी मुनिसर, एफी फ्लेचर, स्टॅफनी टेलर, चिनेल हेन्री, चाडियन नेशन, कियाना जोसेफ, जैदा जेम्स, करिश्मा रामहरक, मँडी मंगरू. नेरिसा क्राफ्टन