ICC T20I Rankings: विराट कोहली, केएल राहुलला टी-20 क्रमवारीत फायदा, अॅडम झांपाची टॉप-5 मध्ये एंट्री, पाहा लेटेस्ट रँकिंग
केएल राहुल आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडूंना मालिकेत आपल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. टॉप-10मध्ये सामील दोन भारतीय फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांना प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत आदिल रशीद तिसऱ्या ठार झांपाची टॉप-5 मध्ये एंट्री झाली आहे.
ICC T20I Rankings: दक्षिण आफ्रिका-इंग्लड, न्यूझीलंड-वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेनंतर आयसीसीकडून (ICC) नुकतीच लेटेस्ट क्रमवारी जाहीर झाली आहे. केएल राहुल (KL Rahul) आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीसह (Virat Kohli) अन्य खेळाडूंना मालिकेत आपल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. टॉप-10मध्ये सामील दोन भारतीय फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांना प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला आहे. राहुलने पहिल्या पाचमधील आपले स्थान कायम ठेवत चौथ्यावरून तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे, तर विराट देखील 9व्या वरून 8 स्थानावर पोहचला आहे. राहुलच्या मागे ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचची (Aaron Finch) मात्र एक स्थानाची घसरण झाली आहे. फिंच चौथ्या स्थानावर घसरला आहे. शिवाय, हजरतुल्ला झझाई 9व्या स्थानावर पोहचला आहे. फिंच दुसरा सामना खेळू शकला नाही तर तिसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. डेविड मलानने पहिले तर बाबर आझमचे दुसरे स्थान कायम आहे. (Most T20I Runs for India in 2020: केएल राहुल यंदा सर्वाधिक धावा करत बनला भारताचा टी-20 'किंग', विराट कोहली 'या' स्थानी)
गोलंदाजांच्या क्रमवारीत राशीद खान अव्वल तर मुजीब उर रहमान दुसर्या क्रमांकावर कायम आहे. आदिल रशिद आणि अॅडम झांपा यांना अनुक्रमे दक्षिण आफ्रिका व भारतविरुद्ध प्रभावी कामगिरीचे सकारात्मक फळ मिळाले आहेत. आदिल रशीद तिसऱ्या ठार झांपाची टॉप-5 मध्ये एंट्री झाली आहे. झांपाला रँकिंगमध्ये दोन स्थानांचा फायदा झाला आणि तो सहाव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर पोहचला. शिवाय, ऑस्ट्रेलियन अॅश्टन अगर सातव्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडचा क्रिस जॉर्डन दोन स्थानांचा फायदा झाल्याने त्याने पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये प्रवेश केला. दरम्यान, इमाद वसीम आणि शेल्डन कॉटरेल यांच्याही क्रमवारीत वाढ झाली आहे.
सिडनी क्रिकेट मैदानावर मंगळवारी झालेल्या टी-20 मालिकेच्या तिसर्या सामन्यात टीम इंडियाला 12 धावांनी पराभव पत्करावा लागला, परंतु असे असूनही संघ 2-1 अशी मालिका जिंकण्यात यशस्वी झाला.