23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन (World Book Day) म्हणून साजरा केला जातो. UNESCO सह जगभरातील साहित्य संबंधित संस्थांकडून दरवर्षी जागतिक पुस्तक दिनाचं सेलिब्रेशन केलं जातं. धोकादायक कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा होत नाहीत आणि क्रिकेट जगातील संस्था आपली कला सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या यादीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) देखील सामील झाली आहे, ज्याने लॉकडाउनमध्ये यूजर्सना क्रिकेट खेळण्याची संधी दिली आहे. लॉकडाउनमुळे क्रिकेटपटू आणि अधिकारी आपापल्या घरी वेळ घालवत आहेत. काहीजण आपली कलात्मकता दर्शवित आहेत तर काही टिकटॉक व्हिडिओ बनवून चाहत्यांशी जोडलेले आहेत. आयसीसीनेही ट्विटरवर हा खेळ शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. (World Book Day 2020: Lockdown असो की 'एकांत', प्रत्येक वेळी नवा अनुभव देणारा मित्र 'पुस्तक')
हा खेळ 'बुक क्रिकेट' सारखा आहे ज्यामध्ये पृष्ठे प्रतिमा (जीआयएफ) चालू करताना दिसतात आणि कोणालाही ते क्लिक करून थांबवावे लागते. तो थांबताच, तो शॉटसह येतो (म्हणजे सहा, चार) किंवा कॅच, बोल्ड येते. आयसीसीने ट्विटरवर व्हिडीओला कॅप्शन देऊन लिहिले आहे की, "वर्ल्ड बुक डे साजरा करण्यासाठी 'बुक क्रिकेट' चा खेळ! जीआयएफवर सहा वेळा टॅप करा आणि ओव्हरनंतर शेवटी आपली धावसंख्या सांगा! 'वर्ल्ड बुक डे'.
A game of 📖🏏 to celebrate #WorldBookDay!
Tap the GIF six times, and tell us your score at the end of the over! pic.twitter.com/M2ndwUIkZh
— ICC (@ICC) April 23, 2020
बरेच यूजर्स त्यांचे स्कोअर सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तुम्हीही पाहा आणि खेळा हा मजेदार खेळ.
बॅट माजी आहे, मी घरी जातोय
1st 🎾 - Bowled
2nd 🎾 - Caught
3rd 🎾 - Run Out
Bat mera hai, mein ghar jaa raha hoon. Bye.
— Godman Chikna (@Madan_Chikna) April 23, 2020
शेवटच्या बॉलमधील क्षण
This epic moment in last Ball pic.twitter.com/p12VYlLCFB
— Virat kohli (@KohliFanteam) April 23, 2020
25/0
25 without any lose . pic.twitter.com/xjSL3CLvxT
— 🔥Shivam Sharma🔥 (@SharmaJiKaTweet) April 23, 2020
26 एकूण धावा
1. Bowled
2. Six
3. Four
4. Six
5. No ball
6. No ball
7. Four
8. Four
26 total runs #Cricket
— Akshay Tadvi🇮🇳 (@imAkshaytadvi) April 23, 2020
World Book Day: जागतिक पुस्तक दिनानिमित्त जाणून घेऊयात पुस्तकांबद्दल काही खास गोष्टी - Watch Video
क्रिकेटबाबत सांगायचे झाले तर कोरोना व्हायरसमुळे कोणतेही सामने होत नाहीत. कोरोना व्हायरसमुळे पुढील सूचना येईपर्यंत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. फक्त आयपीएलच नाही तर पुरुष टी-20 विश्वचषकदेखील पुढे ढकलण्याची शक्यता जास्त आहे.