ICC ची Justice League; केन विल्यम्सन बनला Superman तर Virat Kohli ‘या’ अवतारात, पहा मजेशीर Tweet
आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध हॉलिवूड फिल्म जस्टीस लीगचे पोस्टर पोस्ट केले परंतु कलाकारांच्या चेहऱ्यांच्या जागी त्यांनी पोस्टरला जगप्रसिद्ध क्रिकेटपटूंचे चेहरे दिले आहे. या चित्रात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन सुपरमॅनच्या भूमिकेत दिसत आहे, तर भारतीय कर्णधार कोहली अक्वामनच्या वेशात दिसत आहे.
चाहत्यांसाठी त्यांचे आवडते खेळाडू कोणत्या सुपरहीरोपेक्षा कमी नसतात आणि क्रिकेटर्सदेखील काही वेगळे नाहीत. भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी चाहत्यांसाठी क्रिकेट मैदानावर असे अनेक कृत्य केले आहेत जे सामान्य व्यक्तीसाठी अशक्य असू शकतात. आणि आता चाहत्यांच्या भावांना मान देत आयसीसीने (ICC) या खेळाडूंना चित्रपट जगातील सुपरहीरोचे रूप दिले आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध हॉलिवूड फिल्म जस्टीस लीगचे पोस्टर पोस्ट केले परंतु कलाकारांच्या चेहऱ्यांच्या जागी त्यांनी पोस्टरला जगप्रसिद्ध क्रिकेटपटूंचे चेहरे दिले आहे. या चित्रात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) सुपरमॅनच्या भूमिकेत दिसत आहे, तर भारतीय कर्णधार कोहली अक्वामनच्या वेशात दिसत आहे. इंग्लिश अष्टपैलू स्टोक्सला बॅटमॅनची भूमिका देण्यात आली आहे तर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिस पॅरी (Ellyse Perry) वंडर वूमनच्या वेशात दिसत आहे.
इतकंच नाही तर पाकिस्तानचा नवा कर्णधार बाबर आजम फ्लॅश आणि विंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्ड साइबोर्ग बनला आहे. आयसीसीने पोस्टला कॅप्शन दिलेः “लीग एकत्र करा #SnyderCut.” जस्टिस लीगची (Justice League) बहुप्रतिक्षित झॅक स्नायडर आवृत्ती गुरुवारी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली आहे. जस्टिन लीगची ही नवीन आवृत्ती 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापेक्षा वेगळी असून या चित्रपटाचे दिग्दर्शन जोस विडन यांनी केले आहे, तर नवीन आवृत्तीचे दिग्दर्शन जॅक स्नायडर यांनी केले आहे. विशेष म्हणजे, जस्टिन लीगचे पहिला हप्ता स्नायडर यांनी तयार केला होता परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्यांना हा चित्रपट मधेच अपूर्ण सोडावा लागला, त्यानंतर वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओने मार्व्हलच्या प्रसिद्ध अॅव्हेंजर्स चित्रपटाचे दिग्दर्शक व्हीडन यांना चित्रपट पूर्ण करण्याचे काम दिले होते.
एक्वामनची भूमिका मिळालेला कोहली निःसंशयपणे आधुनिक काळातील क्रिकेटचा महान फलंदाज आहे आणि त्याने भारतासाठी अनेक सामने जिंकवले आहेत. शिवाय, विल्यमसन - सुपरमॅन हा मागील काही वर्षांत न्यूझीलंड संघाचा कणा बनला आहे. 2019 मध्ये इंग्लंडच्या पहिल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बॅटमॅनचे पात्र मिळवलेल्या स्टोक्सने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.