ICC Players of the Month for May 2025: मोहम्मद वसीम आणि चोले ट्रायॉन यांना मे 2025 साठी आयसीसी प्लेअर्स ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर

महिला गटात, चोले ट्रायॉनने मे 2025 साठी आयसीसी महिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. तर, संयुक्त अरब अमिरातीचा कर्णधार मोहम्मद वसीम याची मे 2025 साठी पुरुषांच्या गटात सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

ICC Players of the Month for May 2025: दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू क्लो ट्रायॉनला मे 2025 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महिला खेळाडू ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. क्लोने वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज आणि भारताची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जला मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. श्रीलंकेत झालेल्या एकदिवसीय तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही, तरी क्लोने या महिन्यात चांगली कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेला अंतिम विजेत्या भारताकडून 23 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. क्लोने 43 चेंडूत 67 धावा केल्या. ज्यात चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. याशिवाय, तिने 1-46 धावाही नोंदवल्या आणि स्मृती मानधनाची मौल्यवान विकेटही घेतली.

क्लोची सर्वोत्तम कामगिरी यजमान श्रीलंकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील शेवटच्या सामन्यात होती. प्रथम फलंदाजी करताना क्लॉने 51चेंडूत 74 धावा केल्या. ज्यामध्ये चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेने 315 धावांचा मोठा आकडा गाठला. त्यानंतर क्लॉने तिच्या पहिल्या पाच विकेट्स घेतल्या - तिच्या आठ षटकांत 5-34 धावा देऊन श्रीलंकेच्या फलंदाजीचा क्रम उध्वस्त केला, ज्यामध्ये कोलंबोतील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एक जबरदस्त हॅटट्रिक घेऊन दक्षिण आफ्रिकेला 76 धावांनी विजय मिळवून दिला.

मे 2025 साठी आयसीसी महिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर होताच क्लो ट्रायॉन ने आनंद व्यक्त केला. "मला आनंद आहे की मी अखेर मी अखेर हा सन्मान मिळवू शकले. खरे सांगायचे तर, मी खरोखर आनंदी आहे की मी चांगली कामगिरी करू शकले आणि संघाला विजय मिळवून देऊ शकले."

संयुक्त अरब अमिराती (UAE) चा कर्णधार मोहम्मद वसीम याची मे 2025 साठी ICC पुरुषांच्या गटात सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी निवड झाली आहे. वसीमने स्कॉटलंडच्या ब्रँडन मॅकमुलेन आणि अमेरिकेच्या मिलिंद कुमार यांना पराभूत करून दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. मोहम्मद वसीमने मे महिन्यात ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 आणि बांगलादेशविरुद्धच्या घरच्या T20 मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार जिंकला आहे. बांगलादेशविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत वसीमने 2 अर्धशतकांसह एकूण 145 धावा केल्या आणि संघाला 2-1 अशी मालिका जिंकण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मुहम्मद वसीम

मुहम्मद वसीमला दुसऱ्यांदा आयसीसी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार जिंकल्यानंतर मोहम्मद वसीम म्हणाला, दुसऱ्यांदा आयसीसी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकल्याबद्दल मला आनंद होत आहे. मी आयसीसीचे आणि मला मतदान करणाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. मी माझ्या संघातील सर्व सदस्यांचे आणि सपोर्ट स्टाफचेही आभार मानू इच्छितो कारण हा पुरस्कार त्यांच्यासाठी जितका आहे तितकाच माझ्यासाठीही आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement