IPL Auction 2025 Live

ICC Cyber Crime: ऑनलाईन ठग्गांचा थेट ICC ला चुना, सायबर क्रिमिनल्स कडून ICC ला तब्बल 20 कोटींचा गंडा

या जामतारा स्टाईल फ्रॉड्सना तुम्ही आम्हीच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) देखील बळी पडली आहे.

ICC (Photo Credits: File Image)

आयसीसी एका सायबर गुन्ह्याचा बळी ठरली आहे. ज्यामध्ये ICC ला तब्बल 20 कोटींचा गंडा घातला गेला आहे. यात नेमकी तंतोतंत किती रक्कम रकमेचा चुना आयसीसीला लागला ह्याची अधिकृत माहिती बाहेर आली नसली तरी या घोटाळा अमेरीकेत २०२२ मध्ये घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बिझनेस ई-मेल कॉम्प्रोमाईज म्हणजेचं बीईसीनुसार या घोटाळ्याचं मिशन सायबर ठग्गांनी फत्ते केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी घोटाळ्या झाल्याचं लक्षात आल्यानंतर खुद्द आयसीसीने या घटनेबाबत माहिती दिली आहे. आयसीसी कडून संशयित फसवणुकीचा अहवाल यूएसए मधील कायद्याची अंमलबजावणी  एजन्सीकडे जारी करण्यात आला आहे. तरी या प्रकरणाची युएसमध्ये सखोल चौकशी सुरु आहे. ICC खात्यातून पैसे हस्तांतरित करण्यासाठी फसवणूक करणार्‍यांनी नेमका कोणता मार्ग स्वीकारला - ते दुबईतील मुख्य कार्यालयातील कोणाशी थेट संपर्कात आले होते किंवा ICC विक्रेता किंवा सल्लागार यांना लक्ष्य केले होते हे अद्याप समजू शकलेले नाही. हा व्यवहार एकाच पेमेंटमध्ये झाला होता किंवा अनेक वायर ट्रान्सफर झाले होते याची पुष्टीही झालेली नाही.

 

आयसीसीची फसवणूक करण्यासाठी जामतारा पॅटर्न राबण्यात ल्याचं दिसत आहे. या जामतारा स्टाईल फ्रॉड्सना तुम्ही आम्हीच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) देखील बळी पडली आहे. ऑनलाईन ठगांनी आयसीसीला थोडाथोडका नाहीतर तब्बल 25 लाख डॉलर्स म्हणजेच, भारतीय चलनात तब्बल 20 कोटी चुना लावण्याची माहिती मिळत आहे. घोटाळा झालेल्या रकमेबाबत आयसीसी कडून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी २० कोटी रकमेचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे. (हे ही वाचा:- RCB Twitter Account Hacked: रॉयल चॅलेंजर्स बंग्लोरचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरकडून RCB च्या ट्विटर पेजवर विचित्र ट्विट)

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) फसवणूक झाल्यामुळे खळबळ माजली आहे. ICC सोबतची ही ऑनलाईन फसवणूक फिशिंगच्या माध्यमातून घडली आहे. ही घटना गेल्या वर्षी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये घडली होती. मात्र, या प्रकरणी आयसीसीने फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) कडे तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची एफबीआय चौकशी करत आहे.