ICC Player of the Month Award: जून महिना भारतीय क्रिकेटसाठी खास! आयसीसीने Jasprit Bumrah आणि Smriti Mandhana ला 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्काराने केले सन्मानित
Jasprit Bumrah & Smriti Mandhana: बुमराहने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज यांना पराभूत करून विजेतेपद पटकावले तर मानधनाने इंग्लंडच्या माईया बाउचर आणि श्रीलंकेच्या विस्मी गुणरत्ने यांना पराभूत करून महिला पुरस्कार जिंकला.
ICC Award: टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयी मोहिमेचा नायक जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जून महिन्यासाठी सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवड केली आहे. तसेच, भारतासाठी हा दुहेरी आनंदाचा प्रसंग आहे कारण महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिची आयसीसीने 'जून महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू' म्हणून निवड केली आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बॅटने केलेल्या दमदार कामगिरीबद्दल मानधनला हा पुरस्कार देण्यात आला. बुमराहने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज यांना पराभूत करून विजेतेपद पटकावले तर मानधनाने इंग्लंडच्या माईया बाउचर आणि श्रीलंकेच्या विस्मी गुणरत्ने यांना पराभूत करून महिला पुरस्कार जिंकला.
पुरस्कार जिंकल्यानंतर बुमराहने दिली प्रतिक्रिया
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, बुमराह म्हणाला की, हे जेतेपद जिंकून मला खूप आनंद झाला आहे. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हे काही आठवडे माझ्यासाठी खूप संस्मरणीय राहिले आहेत. एक संघ म्हणून आम्हाला खूप साजरे करायचे होते. स्पर्धेत चमकदार कामगिरी करून ट्रॉफी उंचावणे हे विशेष होते. (हे देखील वाचा: Virat Kohli New Home Video: अलिबागमध्ये विराट कोहलीचा आलिशान बंगला झाला तयार; व्हिडिओ शेअर करून दाखवली घराची झलक (Watch Video)
किताब पटकावणारा बुमराह दुसरा भारतीय स्पेशालिस्ट गोलंदाज
महत्त्वाची बाब म्हणजे आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा किताब पटकावणारा बुमराह हा दुसरा भारतीय स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. बुमराहपूर्वी भुवनेश्वर कुमारने हा पुरस्कार जिंकला होता. त्याची जानेवारी 2021 साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. आता या यादीत बुमराहचेही नाव जोडले गेले आहे.