ICC Awards of The Decade 2020 Live Streaming: आयसीसी दशकांच्या पुरस्कारांचे टेलिकास्ट पहा लाईव्ह Star Sports आणि आयसीसी चॅनेलवर 

दशकाच्या आयसीसी पुरस्कारांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मागील दहा वर्षातील स्टँड-आऊट परफॉर्मर्स आणि क्षण साजरे करण्यासाठी प्रशासक मंडळाने आयोजित केलेल्या वार्षिक पुरस्कार कार्यक्रमाची एक आवृत्ती आहे. भारतीय चाहते आयसीसी पुरस्कारांचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स चॅनेल्सवर पाहू शकतात.

ICC (Photo Credits: File Image)

ICC Awards of The Decade 2020 Live Streaming: दशकाच्या आयसीसी पुरस्कारांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मागील दहा वर्षातील स्टँड-आऊट परफॉर्मर्स आणि क्षण साजरे करण्यासाठी प्रशासक मंडळाने आयोजित केलेल्या वार्षिक पुरस्कार कार्यक्रमाची एक आवृत्ती आहे. 28 डिसेंबर, 2020 रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल जिथे दशकाच्या कसोटी, वनडे आणि टी-20 महिला आणि पुरुषांच्या पुरस्कांची घोषणा केली जाईल. दरम्यान, दशकाच्या आयसीसी पुरस्कारांची घोषणा सर्व आयसीसी (ICC) डिजिटल चॅनेल्सवर केली जाईल. पुरस्कारांचे लाईव्ह प्रक्षेपण आयसीसीच्या फेसबुक आणि यूट्यूब पेजवर दाखवले जाईल. भारतीय चाहते आयसीसी पुरस्कारांचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स (Star Sports) चॅनेल्सवर पाहू शकतात. तर आयसीसी पुरस्कार 2020 चे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग डिस्नी + हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध असेल. (ICC Team Of The Decade: आयसीसीकडून दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी संघाची घोषणा; भारतीय खेळाडूंकडे तिन्ही संघाचे नेतृत्व)

दरम्यान, Rachel Heyhoe-Flint आणि सर गारफिल्ड सोबर्स विजेत्यांना हाताने रंगविलेली कलाकृतीचे बॅट दिले जाईल, तर इतर वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांना मर्यादित-आवृत्तीच्या कॅनव्हास चित्रकला प्राप्त होईल जी त्यांची अनोखी आवड आणि भावना आत्मसात करते. पहा कोणत्या श्रेणीत कोणा-कोणाला मिळाले नामांकन:

दशकातील पुरुष खेळाडू: विराट कोहली (भारत), रविचंद्रन अश्विन (भारत), जो रूट (इंग्लंड), केन विल्यमसन (न्यूझीलंड), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), आणि कुमार संगकारा (श्रीलंका).

दशकातील महिला एकदिवसीय खेळाडू: मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया), मिताली राज (भारत), सुझी बेट्स (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज) आणि झुलन गोस्वामी (भारत).

दशकातील महिला खेळाडू: एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), सुझी बेट्स (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज), मिताली राज (भारत), सारा टेलर (इंग्लंड).

दशकातील पुरुष एकदिवसीय खेळाडू: विराट कोहली (भारत), लसिथ मलिंगा (श्रीलंका), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), रोहित शर्मा (भारत), एमएस धोनी (भारत), आणि कुमार संगकारा (श्रीलंका).

दशकातील पुरुष कसोटी खेळाडू: विराट कोहली (भारत), केन विल्यमसन (न्यूझीलंड), स्मिथ, जेम्स अँडरसन (इंग्लंड), रंगना हेराथ (श्रीलंका), आणि यासिर शाह (पाकिस्तान).

दशकातील पुरुष टी-20 प्लेअर: राशिद खान (अफगाणिस्तान), विराट कोहली (भारत), इमरान ताहिर (दक्षिण आफ्रिका), आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया), लसिथ मलिंगा (श्रीलंका), ख्रिस गेल (वेस्ट इंडीज), आणि रोहित शर्मा (भारत).

आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट ऑफ डिकेड पुरस्कार:

विराट कोहली (भारत), केन विलियम्सन (न्यूझीलंड), ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड), मिस्बाह उल हक (पाकिस्तान), एमएस धोनी (भारत), आन्या श्रुबसोले (इंग्लंड), कॅथरीन ब्रंट (इंग्लंड), माहेला जयवर्धने (श्रीलंका) आणि डॅनियल विटोरी (न्यूझीलंड).

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now