ICCने ‘Player of the Month’ पुरस्काराची केली घोषणा, रिषभ पंत, अश्विनसह टीम इंडियाचे 'हे' तडाखेबाज खेळाडू शर्यतीत

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ अवॉर्ड्सचे उद्घाटन केले असून मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, रिषभ पंत, अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाज अशा युवा खेळाडूंच्या कामगिरीसह रविचंद्रन अश्विन, जो रूट, स्टीव्ह स्मिथ, दक्षिण आफ्रिकेच्या Marizanne Kapp, नादिन डी क्लार्क अशा प्रस्थापित खेळाडूंच्या उमेदवारीची चर्चा संध्या रंगली आहे.

Team India: Photo Credits: ICC

ICC ‘Player of the Month’ Awards: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) आज आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ (ICC Player of the Month) अवॉर्ड्सचे उद्घाटन केले असून प्रत्येक महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम खेळ करणारा पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना देण्यात येणार आहे. त्या महिन्यात खेळल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरूपात त्यांच्या आवडत्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना पुरस्कार देण्यासाठी चाहत्यांना दरमहा ऑनलाईन मतदान करण्याचे आवाहन आयसीसीने केले आहे. आयसीसी (ICC) महिन्याचा पुरुष प्लेअर आणि आयसीसी महिला खेळडूंची निवड करण्यासाठी माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी मतदान अकादमी मतदान करण्यासाठी चाहत्यांसह एकत्र येतील. जानेवारी महिन्यात चाहत्यांना जबरदस्त क्रिकेट सामने पाहायला मिळाले आहेत ज्यामुळे सुरुवातीचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला दिला जाईल याची  सध्या रंगली आहे.

मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, रिषभ पंत, अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाज अशा युवा खेळाडूंच्या कामगिरीसह रविचंद्रन अश्विन, जो रूट , स्टीव्ह स्मिथ, दक्षिण आफ्रिकेच्या Marizanne Kapp, नादिन डी क्लार्क, पाकिस्तानची निदा दार अशा प्रस्थापित खेळाडूंच्या उमेदवारीची चर्चा संध्या रंगली आहे. आयसीसीचे सरव्यवस्थापक जेफ अल्लार्डिस म्हणाले की, “महिन्यातील आयसीसी प्लेअर हा खेळाच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याचा आणि वर्षभरात त्यांच्या आवडत्या खेळाडूंच्या कामगिरीचा साजरा करण्याचा एक चांगला मार्ग आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी मैदानावरील जागतिक स्तरावरील कामगिरीची कबुली देण्याची संधी आमच्या सर्वांना मिळाली आहे आणि जानेवारीत त्या भरपूर प्रमाणात आहेत.”

आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत क्षेत्रातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन नामनिर्देशित उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर या शॉर्टलिस्ट खेळाडूंना स्वतंत्र आयसीसी मतदान अकादमी आणि जगभरातील चाहत्यांद्वारे मत दिले जाईल. आयसीसी मतदान अकादमीमध्ये ज्येष्ठ पत्रकार, माजी खेळाडू आणि प्रसारक यांच्यासह क्रिकेट कुटुंबातील प्रमुख सदस्य असतील.आयसीसीच्या डिजिटल चॅनेल्सवर विजेत्यांची घोषणा महिन्याच्या प्रत्येक दुसर्‍या सोमवारी केली जाईल.