फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर याची मुलगी म्हणते, ‘मी विराट कोहली आहे’; पत्नी कैंडिसने केलेला व्हिडिओ सोशल मीडियात हिट, पाहा Video
यावेळी ती सतत 'मी विराट कोहली आहे' असे म्हणताना दिसतेय. वॉर्नरची छोटी मुलगी इंडी मे वॉर्नर हीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती विराट कोहली असल्याचे सांगत क्रिकेट खेळताना दिसत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे देश-विदेशात बरेच चाहते आहेत. यामध्ये स्वतः क्रिकेट विश्वातील अनेक जणांचा समावेश आहे. आता एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यानुसार काही क्रिकेटपटूंची मुलेही कोहलीचे फॅन आहेत. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) याची मुलगी त्याच्यासोबत क्रिकेट खेळत आहे. यावेळी ती सतत 'मी विराट कोहली आहे' असे म्हणताना दिसतेय. कांगारू संघाकडून विश्वचषक खेळताना वॉर्नरने शानदार प्रदर्शन केले. तथापि, अॅशेस टेस्ट मालिकेत तो फ्लॉप ठरला, पण घरच्या मैदानावर वॉर्नरने बॅट पुन्हा एकदा प्रभावी खेळी करताना दिसला. श्रीलंकाविरुद्ध मालिकेनंतर वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या टी-20 मालिकेत शानदार कामगिरी केली आणि संघाच्या मालिका विजय महत्वाची भूमिका बजावली. यादरम्यान, डेव्हिड वॉर्नरची छोटी मुलगी इंडी मे वॉर्नर (Indi-Mae) हीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती विराट असल्याचे सांगत क्रिकेट खेळताना दिसत आहे. (AUS vs SL T20I 2019: डेविड वॉर्नर याचे तिसरे शानदार अर्धशतक, विराट कोहली याच्या रेकॉर्डची केली बरोबरी करत 'या' विक्रमांची केली नोंद)
वॉर्नरची पत्नी कॅन्डिसने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्यांची मुलगी इंडी मे वडील डेव्हिड बरोबर क्रिकेट खेळत आहेत वॉर्नर गोलंदाजी करीत असून ईव्ही फलंदाजी करीत आहे. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की डेव्हिड गोलंदाजी करणार आहे आणि मुलगी ईव्ही फलंदाजीसाठी सज्ज आहे, यावेळी ती फलंदाजीपूर्वी वारंवार म्हणत आहे की 'मी विराट कोहली आहे, मी विराट कोहली आहे.' यानंतर तिने एक उत्तम शॉटही खेळला. व्हिडिओ पोस्ट करताना वॉर्नरची पत्नी कॅन्डिसने एक कॅप्शन दिले की, 'या लहान मुलीने भारतात बराच वेळ दिला आहे. तिला विराट कोहली व्हायचे आहे.' आयपीएल दरम्यान वॉर्नरचे कुटुंबीयही भारतातच वास्तव्यास आहेत आणि यावेळी त्यांच्या मुली जवळजवळ प्रत्येक सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोचतात.
इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्या अॅशेस मालिकेदरम्यान वॉर्नरचा फॉर्म चिंतेचा विषय होता, परंतु त्याने श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामन्यात ज्या प्रकारे कामगिरी केली, त्या टीम मॅनेजमेंटने सुटकेचा श्वास घेतला असेल. त्याने श्रीलंकाविरुद्ध नाबाद 100, नाबाद 60 आणि नाबाद 57 धावांची खेळी केली, तर पाकिस्तान विरुद्ध 2, 20 आणि नाबाद 48 धावा केल्या आहेत. वॉर्नरला शेवटच्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकदाच बाद करण्यात गोलंदाजांना यश मिळाले आहेत.