Humanity Is Our Identity! लॉकडाऊन दरम्यान गौतम गंभीर फाउंडेशनकडून गरजूंना अन्नदान, दाखविले सामाजिक भान (Video)
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पीडित वंचितांना त्यांची टीम बाहेर येऊन अन्नाचे वाटप करताना दिसली आहे.
भारतात 21 दिवसांच्या लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान क्रिकेट टीमचा माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचं फाउंडेशन गरीब आणि गरजू लोकांना मदत करून सामाजिक जाणीवही दाखविली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पीडित वंचितांना त्यांची टीम बाहेर येऊन अन्नाचे वाटप करताना दिसली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत राजकारणात आलेल्या गंभीरने सोमवारी कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमणाविरूद्ध दिल्ली सरकारला मदत करण्यासाठी खासदार निधीतून 50 लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. गंभीरने कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांना 'सुरक्षित राहू शकतात किंवा तुरूंगात जाऊ शकतात' अशा शब्दात इशारा दिला. राज्य आणि केंद्र सरकारकडून कर्फ्यूचे आदेश असतानाही अनेक राज्यातील नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून आले. त्यानंतर गंभीरने गरज नसतानाही रस्त्यावर फिरणाऱ्यांना चेतावणी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला आहे. ते म्हणाले की कोरोना व्हायरसविरुद्ध निर्णायकपणे लढण्यासाठी ही एक आवश्यक पायरी आहे. ते म्हणाले की, आता जीव वाचविणे हे प्राधान्य आहे. लॉकडाऊनमुळे एकेठिकाणी अडकलेल्यांना गंभीर फाउंडेशनने अन्नदान करून मदत करण्याचा प्रयत्न केला. गंभीरने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, ""मानवता ही आपली ओळख आहे आणि गरजूंना खायला देणे ही आपली जबाबदारी आहे. GGF ने पाऊल चालले आहे, तुम्हीही पुढे या. एकत्र आपण जिंकू. जय हिंद #GGF #इंडियाफाईट्सकोरोना"
दरम्यान, या व्हायरसच्या उद्रेकामुळे सर्व खेळाच्या क्रियाकलापांचे निलंबन करण्यात आले आणि त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या आवृत्तीही काही काळापर्यंत स्थगित करण्यात आली. भारतात आजवर कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 724 वर गेली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, बिहार, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशात या व्हायरसमुळे मृत्यूची नोंद झाली आहे.