IPL Auction 2025 Live

IND vs BAN 3rd T20I: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि बांगलादेशची एकमेकांविरुद्धची 'अशी' आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर

यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. कसोटीनंतर टीम इंडियाने आता टी-20 मालिकाही नावावर केली आहे.

IND vs BAN (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 3rd T20I Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. कसोटीनंतर टीम इंडियाने आता टी-20 मालिकाही नावावर केली आहे.

टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंनी केली आहे चांगली कामगिरी 

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, बांगलादेशविरुद्ध, रोहित शर्माने 13 डावांमध्ये 36.69 च्या सरासरीने आणि 143.67 च्या स्ट्राइक रेटने 477 धावा केल्या आहेत. रोहित शर्मानंतर शिखर धवनचे नाव या यादीत सामील झाले आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवनने 10 डावात 27.70 च्या सरासरीने 277 धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली (२३० धावा) आणि केएल राहुल (४९ धावा) यांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 9 विकेट घेतल्या आहेत. या दोघांशिवाय दीपक चहरने बांगलादेशविरुद्ध 8 विकेट घेतल्या आहेत.

हे देखील वाचा: IND vs BAN 3rd T20I Stats And Record Preview: हैदराबादमध्ये भारत-बांगालेदश आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम

बांगलादेशच्या 'या' खेळाडूंनी केली आहे चांगली कामगिरी 

बांगलादेशचा फलंदाज महमुदुल्लाहने टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. महमुदुल्लाहने टीम इंडियाविरुद्ध आतापर्यंत 240 धावा केल्या आहेत. महमुदुल्लाहनंतर शब्बीर रहमानने सर्वाधिक धावा केल्या आहेत. शब्बीर रहमानने 6 डावात 47.20 च्या सरासरीने आणि 134.85 च्या स्ट्राईक रेटने 236 धावा केल्या आहेत. मुशफिकर रहीमने 11 डावात 119.89 च्या स्ट्राईक रेटने 229 धावा केल्या आहेत. महमुदुल्ला लिटन दास (188 धावा) याचाही या यादीत समावेश आहे. गोलंदाजीमध्ये टीम इंडियाविरुद्ध अल-अमिन हुसैनने 8 आणि रुबेल हुसेनने 7 विकेट्स घेतल्या. या दोघांशिवाय शाकिब अल हसननेही 7 विकेट्स घेतल्या आहेत.

अशी कामगिरी करणारा दीपक चहर 'हा' एकमेव गोलंदाज 

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने 2019 साली बांगलादेश विरुद्ध नागपुरात झालेल्या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. दीपक चहरने 3.2 षटकात 7 धावा देत 6 बळी घेतले. त्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या 144 धावांवर गारद झाला होता. दीपक चहरच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी आहे. याशिवाय टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात एकाही गोलंदाजाला 5 बळी घेता आले नाहीत.