PSL 2020: पाकिस्तान सुपर लीग सुरु होण्याआधी शादाब खान आणि हसन अली या दोन क्रिकेटपटूंमध्ये ट्विटरवर सामना, एकमेकांची खिल्ली उडवली
पाकिस्तानमध्ये लवकरच पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन केले जाणार आहे. पीएसएलमध्ये तिस्पर्धी संघांकडून खेळणारे वेगवान गोलंदाज हसन अली आणि अष्टपैलू शादाब खान एकमेकांची ट्विटरवर खिल्ली उडवली. हसनने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि झाल्मीची पिवळी जर्सी आणि इस्लामाबाद युनायटेडच्या लाल जर्सीचा संदर्भ घेऊन "यलो> रेड" असे कॅप्शन लिहिले.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) आणि अष्टपैलू शादाब खान (Shadab Khan) मैदानावर आणि मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत आणि बर्याच प्रसंगी ती दिसूनही येते. भारतात आयपीएल सुरु होण्यासाठी अजून काही काळ शिल्लक असला तरी पाकिस्तानमध्ये लवकरच पाकिस्तान सुपर लीगचे (Pakistan Super League) आयोजन केले जाणार आहे. पीएसएलमध्ये प्रतिस्पर्धी संघांकडून खेळणाऱ्या या दोन क्रिकेटपटूनी एकमेकांची ट्विटरवर खिल्ली उडवली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये शादाब इस्लामाबाद युनायटेड (Islamabad United) फ्रँचायझीचा कर्णधार आहे तर, हसन पेशावर झल्मी (Peshawar Zalmi) कडून खेळतो. हसनने ट्विटरवर पेशावर झल्मीचे खेळाडू फहीम अशरफ, रुम्मन रायस आणि जफर गोहर यांचा एक व्हिडिओ शेअर केला आणि झाल्मीची पिवळी जर्सी आणि इस्लामाबाद युनायटेडच्या लाल जर्सीचा संदर्भ घेऊन "यलो> रेड" असे कॅप्शन लिहिले.
इस्लामाबाद युनायटेडचा कर्णधार शादाबने हसनच्या ट्विटला उत्तर देत त्याच्या संघाने जिंकलेल्या पीएसएलच्या दोन जेतेपदाची आठवण करून ट्रोल केले. "2 पीएसएल ट्रॉफी> 1 पीएसएल ट्रॉफी," शादाबच्या टीम झल्मीने आजवर फक्त एक पीएसएल विजेतेपद जिंकले आहे. हसन तिथेच थांबला नाही आणि आगामी हंगामात त्याची टीम दुसरी ट्रॉफी जिंकेल असा विश्वास व्यक्त करून शादाबला प्रत्युत्तर दिले. तथापि, त्यांनी प्रत्युत्तरात ट्विट करताना चूक केली आणि लिहिले की, "काळजी करू नका आम्ही यावेळी 2 > 2 करू". शादाबने त्याची चूक लक्षात घेतली आणि म्हणाला "पहिली गोष्ट 2 = 2 असतं, 2> 2 होऊ शकत नाही." शादाब इस्लामाबाद युनायटेडबरोबर फक्त एकच ट्रॉफी जिंकली कारण 2016 च्या हंगामात तो संघाबरोबर नव्हता , असे सांगून हसनने त्याला प्रत्युत्तर दिले.
पाहा दोन्ही मित्रांमधील ट्विटर वॉर
पीएसएल ट्रॉफीज
2 > 2 करू
2=2 असतं
दोन वेळा स्पर्धा जिंकून इस्लामाबाद युनायटेड हा पीएसएलचा सर्वात यशस्वी संघ बनला आहे. पेशावर झल्मी 2017 आणि क्वेटा ग्लेडीएटर्स 2019 यान दोन संघांनीही जेतेपद जिंकले आहेत. 2020 पीएसएल 22 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 22 मार्च रोजी खेळला जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)